शहरं
Join us  
Trending Stories
1
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
2
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
3
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
4
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
5
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
6
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
7
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
8
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
9
"अधिक मुलं जन्माला घाला", पोप फ्रान्सिस यांच्याकडून इटलीतील लोकांना आवाहन
10
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
11
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
12
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
13
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
14
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
15
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
16
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
17
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
18
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
19
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
20
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल

Thane: ठाण्यात बर्निंग कारचा थरार, वाहतूक पाउण तास ठप्प, नितीन उड्डाणपुलावरील घटना

By जितेंद्र कालेकर | Published: March 18, 2024 8:19 PM

Thane News: मुंबई-नाशिक पूर्व द्रूत गती मागार्वरील नितीन कंपनी उड्डाणपूलावर एका माेटारकारला अचानक सोमवारी दुपारी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना निदर्शनास आली. या आगीत कारच्या आतील बाजूचे पूर्णतः नुकसान झाले आहे.

ठाणे -  मुंबई-नाशिक पूर्व द्रूत गती मागार्वरील नितीन कंपनी उड्डाणपूलावर एका माेटारकारला अचानक सोमवारी दुपारी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना निदर्शनास आली. या आगीतकारच्या आतील बाजूचे पूर्णतः नुकसान झाले आहे. ही आग अर्ध्या तासात नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. आगीच्या घटनेने मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक सुमारे पाऊण तास ठप्प झाली होती.

दीपक गवळी हे मुंबईतील घाटकोपर येथून वाघबीळकडे डेकाेरेशन साहित्य घेउन ही कार घेऊन निघाले होते. नितीन कंपनी उड्डाणपूलावर आल्यावर अचानक कारने पेट घेतला. ही माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस कर्मचारी,आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. एका फायर वाहनासह, रेस्क्यू वाहन, वॉटर मिक्स फायर टेंडर वाहनाच्या मदतीने या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. कारमधून दीपक हे एकटेच प्रवास करीत होते. पेट घेतलेली कार रस्त्याच्या एका बाजूला गेल्यावर रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

टॅग्स :thaneठाणेfireआगcarकार