शहरं
Join us  
Trending Stories
1
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
2
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
3
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
4
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
5
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
6
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
7
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
8
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
9
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
10
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
11
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
12
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
13
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक
14
ई-बस प्रवाशांसाठी STकडून मासिक, त्रैमासिक पास योजना सुरू; प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
15
महिलांसाठी आनंदाची बातमी! 'या' राज्यात आता १२ दिवसांची मासिक पाळी रजा मिळणार, सरकारची घोषणा
16
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
17
Nobel Prize : साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा, हंगेरीचे लास्झलो क्रास्नाहोरकाई ठरले मानकरी
18
Astro Tips: १० ऑक्टोबरला रात्री ठीक १० वाजून १० मिनिटांनी इच्छापूर्तीसाठी करा 'हे' काम!
19
बाजाराचं जोरदार कमबॅक! एका दिवसात गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फायदा, 'हे' शेअर्स होते टॉप गेनर्स
20
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं

कर्जमाफीसाठी ठाणे - पालघर जिल्ह्यातील ३२२५ शेतकऱ्यांना २८ कोटी ५८ लाख १३ हजार ९०२ रूपये भरण्याची सक्ती

By सुरेश लोखंडे | Updated: December 21, 2017 15:33 IST

कर्जमाफीच्या लाभासाठी दीड लाखांच्यावर थकबाकीची रक्कम असलेले ठाणे जिल्ह्यातील एक हजार ७३७ व पालघरमधील एक हजार ४८८ आदी तीन हजार २२५ शेतकरी देखील कर्जमाफीला पात्र ठरले आहेत. परंतु त्यांच्याकडील थकबाकी असलेली २८ कोटी ५६ लाखां १३ हजार ९०२ रूपये थकबाकी ३१ मार्च २०१८ पर्यंत त्यांना भरणे अपेक्षित आहे

ठळक मुद्देठाणे व पालघर जिल्ह्यातील २९ हजार ५५५ थकबाकी, कर्जदार शेतकऱ्यांच्या खात्यात ९५ कोटी ४० लाख ८५ हजार ६६० रूपयांची कर्जमाफी वदीड लाखांच्यावर थकबाकीची रक्कम असलेले ठाणे जिल्ह्यातील एक हजार ७३७ व पालघरमधील एक हजार ४८८ आदी तीन हजार २२५ शेतकरी देखील कर्जमाफीला पात्र ठरले आहेतत्यांच्याकडील थकबाकी असलेली २८ कोटी ५६ लाखां १३ हजार ९०२ रूपये थकबाकी ३१ मार्च २०१८ पर्यंत त्यांना भरणे अपेक्षित

ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफी रकमेचा लाभ घेण्यासाठी दीड लाखांच्यावरची कर्जाची रक्कम प्रथम शेतकऱ्यांना भरणे सक्तीचे आहे. यानुसार ठाणे व पालघर जिल्ह्यातील ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (टीडीसीसी) थकबाकीदार असलेल्या तीन हजार २२५ शेतकऱ्यांना प्रथम सुमारे २८ कोटी ५८ लाख १३ हजार ९०२ रूपये भरणे अपेक्षित आहे. त्यानंतरच त्यांना संपूर्ण कर्जमाफी योजनेचा लाभ देणे शक्य होणार आहे.नुकतीच ठाणे व पालघर जिल्ह्यातील २९ हजार ५५५ थकबाकी, कर्जदार शेतकऱ्यांच्या खात्यात ९५ कोटी ४० लाख ८५ हजार ६६० रूपयांची कर्जमाफी व प्रोत्साहनपर लाभ वर्ग करण्यात आला आहे. या प्रमाणेच कर्जमाफीच्या लाभासाठी दीड लाखांच्यावर थकबाकीची रक्कम असलेले ठाणे जिल्ह्यातील एक हजार ७३७ व पालघरमधील एक हजार ४८८ आदी तीन हजार २२५ शेतकरी देखील कर्जमाफीला पात्र ठरले आहेत. परंतु त्यांच्याकडील थकबाकी असलेली २८ कोटी ५६ लाखां १३ हजार ९०२ रूपये थकबाकी ३१ मार्च २०१८ पर्यंत त्यांना भरणे अपेक्षित आहे, तरच कर्जमाफीचा लाभ त्यांना त्वरीत देणे शक्य असल्याचे मत टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष भाऊ कु-हाडे व सीईओ भगिरथ भोईर यांनी सांगितले.या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दीड लाख रूपयांवरील थकबाकीची रक्कम भरल्यानंतर टीडीसीसी बँकेत देखील शासनाकडून त्वरीत ४८ कोटी ३७ लाखां रूपये जमा होणार आहे. यामुळे बँकेच्या गंगाजळीत मोठ्याप्रमाणात भर पडले. यासाठी बँकेचे अधिकारी, कर्मचारी देखील संबंधीत शेतकऱ्यांशी संपर्क साधून आहेत. दीड लाखांपेक्षा कमी कर्ज असलेल्या ठाणे जिल्ह्यातील १४ हजार ७३५ शेतकऱ्यांच्या खात्यात ४५ कोटी ७९ लाख २३२ रूपये वर्ग करण्यात आले आहेत. यांपैकी सात हजार ४९८ थकबाकीदार शेतकºयांना ३४ कोटी ४९ लाख ३१ हजार २८ रु पये तर सात हजार २३७ खातेदारांना ११ कोटी२९ लाख ६९ हजार २०४ कोटी प्रोत्साहनपर रकमेचा लाभ मिळाला आहे. पालघर जिल्ह्यातील १४ हजार ८२० खातेदार शेतकºयांच्या खात्यात ४९ कोटी ६१ लाखा ८५ हजार ४२९ रूपये वर्ग करण्यात आले आहेत. यातील नऊ हजार १५ थकबाकीदार खातेदारांना ३९ कोटी ९२ लाख एक हजार ९२६ रूपये कर्जमाफी तर पाच हजार ८०५ खातेदारांना नऊ कोटी ६९ लाख ८३ हजार ५०३ रूपये प्रोत्साहनपर रक्कम जमाझाली आहे. योजने अंतर्गत १ एप्रिल २००९ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत वाटप कर्जास कर्जमाफी मिळणार आहे.

टॅग्स :thaneठाणेMaharashtraमहाराष्ट्रcollectorतहसीलदार