शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या सावत्र पित्याला जन्मठेपेची शिक्षा

By जितेंद्र कालेकर | Updated: December 7, 2022 21:20 IST

ठाणे पोक्सो न्यायालयाचा निकाल, २० हजारांच्या दंडाचीही शिक्षा

ठाणे: आपल्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या सावत्र पित्याला २० वर्षे सश्रम कारावासाची तसेच २० हजार रुपये दंडाची आणि दंड न भरल्यास २०० दिवस साध्या कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ठाण्याच्या अतिरिक्त विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विशेष पोक्सो न्यायाधीश वी. वी. वीरकर यांनी बुधवारी ही शिक्षा सुनावली. याशिवाय, धमकी दिल्याप्रकरणीही आरोपीला दोन वर्षे सश्रम कारावासासह दोन हजारांच्या दंडाची अतिरिक्त शिक्षाही सुनावण्यात आली आहे. 

ठाण्यातील दिवा भागात ४ सप्टेबर २०१८ रोजी हा घृणास्पद प्रकार घडला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुलीच्या आईनेच आपल्या दुसऱ्या पतीविरुद्ध हा गुन्हा दाखल केला होता. पहिल्या पतीशी भांडण झाल्यामुळे दोन मुलांसह ही महिला २००८ पासून माहेरीच वास्तव्य करीत होती. दरम्यान तिने २०१३ मध्ये दुसरे लग्न केले. या दुसऱ्या पतीपासूनही तिला एक मुलगा झाला होता.

पहिल्या पतीचा एक मुलगा, एक मुलगी तसेच दुसऱ्या पतीपासून झालेला मुलगा आणि पती असे सर्वजण ते एकत्र वास्तव्य करीत होते. दरम्यान, ५ सप्टेंबर २०१८  रोजी या महिलेच्या ११ वर्षीय मुलीच्या पोटात दुखत असल्याचे तिने सांगितल्यानंतर हा प्रकार समोर आला. आपल्याच सावत्र पित्याने सर्वांना ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर चार ते पाच वेळा लैंगिक अत्याचार केल्याची बाब आईने विश्वासात घेतल्यानंतर मुलीने सांगितली. हा प्रकार उघड होताच याप्रकरणी या महिलेने मुंब्रा पोलीस ठाण्यात  पती विरोधात तक्रार दाखल केली होती. मुंब्रा पोलिसांनी त्याला अटकही केली होती. याच प्रकरणाची सुनावणी ७ डिसेंबर रोजी ठाणे न्यायालयात झाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश शिंदे यांनी तपासी अधिकारी तर पोलीस नाईक  विद्यासागर कोळी यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले. सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी नऊ साक्षीदार तपासून आरोपीला जास्तीत शिक्षा होण्यासाठी भक्कमपणे बाजू मांडली. सर्व बाजू पडताळून आरोपीला दोषी ठरवून न्यायालयाने सावत्र पित्याला २० वर्षे सश्रम कारावासाची तसेच २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी