शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे : तरुणीची छेड काढणाऱ्या रिक्षा चालकाला २४ तासांत अटक

By अजित मांडके | Updated: October 15, 2022 16:18 IST

ठाण्यात रिक्षाचालकाने तरुणीची छेड काढल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली होती.

ठाणे : ठाण्यात रिक्षाचालकाने तरुणीची छेड काढल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली होती. या तरुणीने यावेळी विरोध केल्याने तिला त्याने काही अंतरापर्यंत फरफटत नेले. यात ती तरुणी जखमी झाली. याप्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आल्यानंतर त्याची गंभीर दखल घेत अवघ्या २४ तासाच्या आत दिघा येथून ३६ वर्षीय रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली. दारूच्या नशेत आपण हें कृत्य केल्याची कबुली त्याने पोलिसांकडे दिली.

ठाणे स्टेशन रोड परिसरात शुक्रवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणी आपल्या कामानिमित्त जात होती. त्या ठिकाणी हा रिक्षाचालक आला. त्या रिक्षाचालकाने तरुणीला इशारे करत तिची छेड काढली. तरुणीने विरोध केला असता या रिक्षाचालकाने त्या ठिकाणाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणीने त्याला पळण्यापासून रोखले. रिक्षाचालक रिक्षात बसून पळत असताना तरुणीने त्याच्या कॉलरला धरून बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला होता. मात्र रिक्षा चालकाने रिक्षा सुरू करून या तरुणीला फरफटत घेऊन गेला. काही वेळा फरफटत गेल्यानंतर तरुणी पडली. या घटनेत तरुणी जखमी झाली. तर रिक्षाचालक पसार होण्यात यशस्वी झाला.

हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. याप्रकरणी जखमी तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून ठाणे नगर पोलिसांनी तपास सुरु केला. तपासा दरम्यान तांत्रिक बाजू तपासून तसेच खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सबंधित रिक्षाचालक हा दिघा येथे राहत असल्याचे उघड झाले. त्यानुसार ठाणे नगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजित बडे यांच्या पथकाने शनिवारी सकाळी कारवाई करून कटिकादला उर्फ राजु विरांगणेलू (३६) याला दिघा येथून अटक केली. दारूच्या नशेत आपण हें कृत्य केल्याची कबुली संबंधित रिक्षाचालकाने चोकशीत पोलिसांना दिली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक दुमलवाड करीत आहेत.कसे पकडले सीसीटीव्हीमध्ये रिक्षाचा नंबर दिसत नव्हता. पण मागे स्टीलचे गार्ड वगैरे लावले होते. असे गार्ड नवी मुंबई भागात लावलेले दिसतात. आरोपी थोडा जाड आणि चोटी ठेवणारा आहे अशी माहिती मुलीने दिली होती. त्यावरून राजू नावाचा असा रिक्षा चालक आहे अशी माहिती मिळाली. पोलिसांनी दिघा भागात सर्व पार्किंग रिक्षा शोधायला सुरुवात केली. रात्रभर शोध सुरू होता. तेव्हा दिघा भागात अशीच एक गार्डची रिक्षा सापडली. तेव्हा ती रिक्षा पण राजूची असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

मग त्याच परिसरात शोध सुरू केला. तेव्हा त्याच्या घरी राजू सापडला, त्याने ताबडतोब कबूल केले की माझी चूक झाली. तसंच लोक मारतील म्हणून पळून गेलो. काल कळव्यातून भाडे घेतले, स्टेशनला भाडे सोडले. तिकडे एक इडली वाला आहे त्याकडे तो थांबलेला, तेव्हा त्याने या मुलीला पाहिले आणि छेड काढली, आणि पुढची घटना घडली, असंही सांगितलं.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस