शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Thane: ठाणे जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ‘कलाविष्कार’, क्रीडा स्पर्धा जल्लोषात ! 

By सुरेश लोखंडे | Updated: January 18, 2024 21:40 IST

Thane News: ​​​​​​​ठाणे येथील जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी संस्कृतिक व क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असता  हे कार्यक्रम जल्लोषात पार पडले. आज येथील मावली मंडळाच्या मैदानावर क्रीडा स्पर्धा झाल्या.

- सुरेश लोखंडे ठाणे - येथील जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी संस्कृतिक व क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असता  हे कार्यक्रम जल्लोषात पार पडले. आज येथील मावली मंडळाच्या मैदानावर क्रीडा स्पर्धा झाल्या. तर राम गणेश गडकरीं रंगायतनमध्ये बुधवारी सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वीरित्या झाला आहे.सुदृढ आरोग्य  आणि आनंदी जीवनासाठी कार्यशील व प्रयत्नशील रहा , असे मार्गदर्शन यावेळी या ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी त्यांच्या या अधिकाराचा, कर्मचाऱ्यांना या प्रसंगी केले आहे.

आजच्या क्रीडा महोत्सव  मावळी मंडळ, चरई, ठाणे-प येथे संपन्न झाले.  जिंदल यांच्या हस्ते मशाल ज्योत पेटवण्यात आली. या क्रीडा महोत्सवात कबड्डी, लंगडी, रस्सी खेच, क्रिकेट हे खेळ सांघिक पध्दतीने खेळले, वैयक्तिक खेळांमध्ये महिला व पुरुषांसाठी १०० मिटर धावणे, लांब उडी, गोळा फेक, तीन पायांची शर्यत तर ५० वर्षावरील महिला व पुरुष कर्मचाऱ्यांसाठी ५० मिटर धावणे, जलद चालणे, तीन पायांची शर्यत अशा स्पर्धां घेण्यात आल्या. इनडोअर गेम मध्ये कॅरम व बुध्दीबळ हे दोन खेळ ठेवण्यात आले होते.  या सर्व स्पर्धेनंतर पारितोषिक वितरण सोहळा आज उशिरापर्यंत जल्लोषात पार पडला. विजेत्या स्पर्धकांचा पारितोषिक वितरण सोहळा रात्री उशिरापर्यंत रंगला.

 आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा मनमुराद आनंद घ्या. दरवर्षी नवीन वर्षात संकल्प करून दररोज नव्याने सुरूवात करा. सर्व चांगल्या सवयीचा अंगिकार करा. उत्तम आरोग्य आणि आनंद यासाठी कार्यशील व प्रयत्नशील रहा असे मार्गदर्शन  जिंदाल यांनी यावेळी केले. या कार्यक्रमासाठी सामान्य प्रशासन विभागाने पुढाकार घेऊन उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले . या कार्यक्रमांसाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, प्रकल्प संचालक . छाया शिसोदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग  प्रमोद काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी  वैजनाथ बुरुडकर, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग प्रमुख पंडित राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, शिक्षणाधिकारी माध्यमिक ललिता दहितुले, शिक्षणाधिकारी प्राथमिक .भाऊसाहेब कारेकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणे