शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे स्थानकही चकाकणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 02:03 IST

विमानतळासारखी अभूतपूर्व रोषणाई, मॉल, चकाचक फलाट, सुसज्ज हॉटेल, कॅफेटेरियासह इतर ब्रॅण्डेड वस्तूंच्या दुकानां...

नारायण जाधव  ठाणे : विमानतळासारखी अभूतपूर्व रोषणाई, मॉल, चकाचक फलाट, सुसज्ज हॉटेल, कॅफेटेरियासह इतर ब्रॅण्डेड वस्तूंच्या दुकानांची साखळी लवकरच ठाण्यासह देशातील ६०० रेल्वे स्थानकांत पाहायला मिळणार आहे. यातील पहिल्या टप्प्यात पाच हजार कोटी रुपये खर्चून १० रेल्वेस्थानकांचा विमानतळांच्या धर्तीवर विकास करण्यात येणार असून त्यात ठाणे स्थानकाचाही समावेश आहे. या सर्व रेल्वेस्थानकांचा पीपीपी तत्त्वावर विकास करण्यासाठी खासगी कंपन्यांनी पुढे यावे, याकरिता रेल्वेने त्यासाठीच्या अटी व शर्ती आणखी शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, लीजचा कालावधी ३० वर्षांवरून ४५ वर्षे केल्यानंतर त्यात आणखी वाढ करण्याचा विचार सुरू झाला आहे.नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन्स कंपनी, इंडियन रेल्वेस्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनसह खासगी कंपन्यांच्या सहकार्याने या ६०० रेल्वेस्थानकांचा सुसज्ज विकास करण्यात येणार आहे. यात पहिल्या टप्प्यात ज्या १० रेल्वेस्थानकांचा विकास करण्यात येणार आहे, त्यात दिल्लीचे सराई रोहिला, लखनऊ, गोमतीनगर, कोटा, तिरुपती, नेल्लोर, एर्नाकुलम, पाँडिचेरी, मडगाव आणि ठाणे स्थानकाचा समावेश आहे. या स्थानकांचे काम डिसेंबरअखेरपर्यंत सुरू करण्याचा रेल्वेचा मानस असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.मात्र, ठाणे स्थानकाचा विकास करताना तो सध्याच्या ब्रिटिशकालीन स्थानकाचा होणार की विस्तारित नव्या स्थानकाचा होणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. परंतु, जाणकारांच्या अंदाजानुसार मनोरुग्णालयाच्या जागेवरील नव्या विस्तारित ठाणे स्थानकाचाच या प्रकल्पात समावेश असावा, असा अंदाज आहे.देशातील प्रमुख स्थानकांचा विमानतळासारखा सुसज्ज विकास करावा, असा विचार सर्वप्रथम २०१५ मध्ये रेल्वे मंत्रालयात चर्चेला आला. परंतु, त्यासाठी निधी कोठून आणणार, हा मोठा प्रश्न होता. परंतु, तो खासगी विकासकांच्या सहकार्यातून पीपीपी तत्त्वावर करावा, असा एक विचार पुढे आला. परंतु, त्यानंतरही रेल्वेच्या जाचक अर्टी व शर्ती पाहता कोणी विकासक पुढे येत नसल्याचे पाहून आता या अटी व शर्ती शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, रेल्वेस्थानकाचा भूखंड लीजवर देताना तो ३० ऐवजी ४५ वर्षांकरिता द्यावा, असे मागे ठरले होते. परंतु, त्यात आता वाढ करण्याचे घाटत आहे. लीजचा कालावधी वाढवून दिल्याने विकासकास त्याने खर्च केलेले पैसे वसूल करण्यास मदत होईल, असे आता सांगण्यात येत आहे.नवीन रेल्वे स्थानकाच्या उभारणीसाठी तयार करण्यात आलेल्या ११९ कोटी रु पयांच्या आराखड्यास रेल्वे विभागाने काही महिन्यांपूर्वी मंजुरी दिली होती.यामध्ये नव्या स्थानकापर्यंत जाणाऱ्या मार्गिका, तिथल्या प्रवासी सेवा, वाहनांसाठी पूल आणि विद्युत व्यवस्था अशा कामांचा समावेश आहे.याच कामांसाठी निविदा काढण्यात येणार असून ही कामे स्मार्ट सिटीच्या निधीतून केली जाणार असल्याचे ठाणे महापालिकेने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. नवीन स्थानकासाठी आवश्यक असलेल्या मनोरु ग्णालयाच्या जागा हस्तांतराबाबत आरोग्य विभागाने यापूर्वीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. ही जागा ताब्यात आल्यानंतर प्रत्यक्षातील कामासाठी निविदा प्रक्रि या करावी लागणार आहे.