शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

Thane: राज्यातील पहिल्या सौर ऊर्जेवरील कार्बन न्यूट्रल व्हिलेज प्रकल्पाचा भिवंडीत शुभारंभ

By नितीन पंडित | Updated: March 11, 2024 19:00 IST

Bhiwandi News: केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ग्राम सुराज्य अभियान अंतर्गत सौर उर्जे वरील कार्बन न्युट्रल ग्राम अभियाना राबविले जात आहे.या प्रकल्प राबविण्यासाठी महाराष्ट्रातील पहिल्या पथदर्शी गावांमध्ये  भिवंडी तालुक्यातील दुधनी वाफे या दोन आदिवासी गावांची निवड करण्यात आली.

- नितीन पंडितभिवंडी - केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ग्राम सुराज्य अभियान अंतर्गत सौर उर्जे वरील कार्बन न्युट्रल ग्राम अभियाना राबविले जात आहे.या प्रकल्प राबविण्यासाठी महाराष्ट्रातील पहिल्या पथदर्शी गावांमध्ये  भिवंडी तालुक्यातील दुधनी वाफे या दोन आदिवासी गावांची निवड करण्यात आली असून ऑनलाईन पद्धतीने या योजनेचा शुभारंभ सह्याद्री अतिथीगृहातुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते सोमवारी करण्यात आला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार,केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील उपस्थित होते तर दुधनी येथे झालेल्या कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद सदस्य देवेश पाटील,जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे,गटविकास अधिकारी डॉ प्रदीप घोरपडे,अतिरिक्त गटविकास अधिकारी इंद्रजित काळे,महाप्रित संस्थेचे महाव्यवस्थापक तेजस शिंदे,धनाजी काळे यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

या नावीन्यपूर्ण प्रकल्पात या दोन्ही गावातील ८०५ कुटुंबीयांना सौर ऊर्जा उपलब्ध होणार असून महाप्रित संस्थेतर्फे हा प्रकल्प उभा करण्यासाठी दोन कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे.ग्रामपंचायत मालकीच्या या योजनाचे नियंत्रण ग्राम ऊर्जा समिती करणार असून सौर उर्जे द्वारे उत्पादित वीज महावितरणच्या रोहीत्रा मार्फत सर्व ग्रामस्थांना वितरित होणार असून यामध्यामातून अतिरिक्त होणारी वीज खरेदी केल्यानंतर महावितरण कंपनी ग्रामपंचायतीस पैसे देणार आहेत.ज्याचा उपयोग ग्राम विकासासाठी होणार आहे अशी माहिती महाप्रित संस्थेचे महाव्यवस्थापक तेजस शिंदे यांनी दिली आहे.या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाप्रित संस्थे तर्फे सर्व कुटुंबीयांना निरधूर चुलीचे वितरण होणार असून त्याचा शुभारंभ आज दहा कुटुंबीयांना मान्यवरांच्या शुभहस्ते निरधूर चुली देऊन करण्यात आला.

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडी