शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Thane: ठाण्यात एसटी बसचा अपघात, वाहक आणि महिला प्रवासी जखमी, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

By अजित मांडके | Updated: July 8, 2023 09:41 IST

Thane ST bus Accident News: ठाण्यातून बोरिवलीला निघालेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी) बसचा ठाण्यातील पूर्व द्रुतगती महामार्गावर शनिवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. भरधाव वेगाने बस घेऊन जाताना, बसच्या पुढे असलेल्या कंटेनरला त्याने मागून जोरदार धडक दिल्याचे प्राथमिक दर्शनी दिसत आहे.

- अजित मांडके ठाणे : ठाण्यातून बोरिवलीला निघालेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी) बसचा ठाण्यातील पूर्व द्रुतगती महामार्गावर शनिवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. भरधाव वेगाने बस घेऊन जाताना, बसच्या पुढे असलेल्या कंटेनरला त्याने मागून जोरदार धडक दिल्याचे प्राथमिक दर्शनी दिसत आहे.

वाहक बसलेल्या बसचा दर्शनीभागाचे मोठया प्रमाणात झाले. यावेळी बसमध्ये ९ प्रवासी होते, त्यामधील बस वाहक अमर परब (३८) आणि प्रवासी महिला गीता कदम (४१) हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांच्या ठामपाच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच त्या दोघांच्या दोन्ही पायाला दुखापत झालेली आहे. तसेच इतर प्रवासी सुखरूप असल्याने ते घटनास्थळावरून आपापल्या घरी मार्गस्थ झाले आहेत.

एसटी बस चालक संदीप पाटील (३७) आणि जखमी वाहक अमर परब हे दोघे ठाण्यातून MH 14 BT 4489 या क्रमांकाची एसटी बस घेऊन बोरीवलीला निघाले होते. यावेळी बसमध्ये चार महिला आणि पाच पुरुष असे ९ प्रवासी बसलेले होते. बस पूर्व द्रुतगती महामार्गावर आल्याने चालक पाटील यांनी वेग वाढला असल्याने ज्युपिटर हॉस्पिटल समोर आल्यावर बसने पुढे असलेल्या कंटनेरला वाहक बसत असलेल्या साईटने मागून धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती. वाहकाच्या बाजूची साईटचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवाय बसचे वाहक परब आणि डोंबिवली कोपर,आयरे गाव येथील  प्रवासी महिला कदम असे दोघे त्या अपघात जखमी झाले आहेत. त्या दोघांच्या दोन्ही पायाला दुखापत झालेली आहे.

अपघातानंतर कंटेनर चालक पसार झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कापूरबावडी पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली होती. सकाळी झालेल्या या अपघाताने त्या परिणाम वाहतुकीवर झाला होता. तसेच अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या एका बाजूला करण्यात आली त्यानंतर तो रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास कापूरबावडी पोलीस करत आहेत. 

टॅग्स :thaneठाणेAccidentअपघात