शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे स्पोर्टींग क्लबच्या निवडणुकीत अखेर भाजपाच्या मढवींचा वरचष्मा!

By सुरेश लोखंडे | Updated: September 19, 2022 18:50 IST

चुरशीच्या लढतीत एक जागा जास्त जिंकली

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: येथील सेंट्रल मैदानावरील स्पोर्टींग क्लब कमिटीची त्रैवार्षिक निवडणूक रविवारी पार पडली. निवडणुकीसाठी भाजपाचे शहर उपाध्यक्ष व स्पोर्टींग क्लबचे अध्यक्ष डॉ. राजेश मढवी यांच्या पॅनलमधील नऊ उमेदवारांपैकी पाच जणांचा विजय झाला. तर शिवसेनेच्या शिंदे गटाचे विकास रेपाळे यांच्या पॅनलमधील चार जण विजयी झाले. या स्पोर्टींग क्लबच्या व्यवस्थापकीय कमिटीवर  एक जागा जास्त जिंकूण मढवींना त्यांचा वरचष्मा राखता आला आहे.

शंभरव्या वर्षात पदार्पण केलेल्या या स्पोर्टीग क्लबची निवडणूक  येथील सेंट्रल मैदानावरील कार्यालयात रविवारी संध्याकाळी ६ ते रात्री ९ वाजेदरम्यान पार पडली.  तत्पूर्व या निवडणुकीस अनुसरून व्यवस्थापकीय कमिटी विरोधात धर्मदाय आयुक्तालयाकडे वाद गेला होता. यावेळी मात्र विरोधातील दोन्ही अर्ज फेटाळून लावत निवडणूक घेण्याचे आदेश मिळाले आणि रविवारी ही निवडणूक झाली. यानंतर मतमोजणी रात्री उशिरापर्यंत झाली. या निवडणुकीसाठी १४९ सभासदांना मतदानाची संधी मिळाली होती. त्यापैकी १३८ जणांनी मतदान केले. उर्वरित सभासद तटस्थ राहिले.

या निवडणुकी मढवी व रेपाळे या दोन्ही पॅनलमध्ये प्रत्येकी नऊ जणांनी या निवडणुकीत नशिब अजमावले. यामध्ये मढवी यांनी सर्वाधिक ९४ मते घेऊन विजय मिळवला आहे. त्यानंतर त्यांच्या पॅनलमधील व विद्यमान सचिव दिलीप धुमाळ, यांच्यासह किशोर ओवळेकर, योगेश महाजन, सुशिल म्हापुस्कर या पाच जणांचा विजय झाला आहे. तर रेपाळे यांना ८० जणांनी मतदान करून विजयी केले. त्यांच्यासह पॅनलमधील कैलाश दे देवल, श्रावण तावडे, प्रशांत गावंड या चार जणांचा विजय झाला आहे. या स्पोर्टींग क्लबच्या व्यवस्थापकीय कमिटीवर विजयी झालेल्या नऊ जणांमधून आता अध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे ठाणेकरांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :thaneठाणेElectionनिवडणूक