शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे : अवैध बांधकामांमुळे मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नावर बोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 01:58 IST

मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलासारखे आलिशान बिझनेस ग्रोथ सेंटर डोंबिवलीत निर्माण व्हावे व एक लाख लोकांना रोजगार मिळावा या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नावर बनावट कागदपत्रांच्या आधारे अवैध इमारतींचे बांधकाम

ठाणे : मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलासारखे आलिशान बिझनेस ग्रोथ सेंटर डोंबिवलीत निर्माण व्हावे व एक लाख लोकांना रोजगार मिळावा या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नावर बनावट कागदपत्रांच्या आधारे अवैध इमारतींचे बांधकाम करणा-या राजकीय नेते, सरकारी अधिकारी आणि या इमारतींमध्ये घरे खरेदी करण्याकरिता कर्ज देणाºया बँकांनी अक्षरश: वरवंटा फिरवला आहे. अवैध बांधकामे करुन या मंडळींनी कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे.निळजे, घेसर, काटई, नांदिवली, हेदुटणे, कोळे, भोपर आदी गावांमधील ग्रोथ सेंटरच्या निर्मितीमुळे सुमारे एक लाख लोकांना रोजगार मिळेल. मात्र, त्या गावांमध्ये गेल्या काही काळात असंख्य अवैध इमारती अचानक उभ्या राहिल्या आहेत. अवैध बांधकामांच्या धंद्यामध्ये शिवसेना सोडून अन्य सर्व पक्षांचे नेते सामील आहेत, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. हा सगळा कारभार खोटी कागदपत्रे बनण्यापासून सुरू होतो. आपल्याला हव्या त्या तारखेनुसार अधिकाºयाची सही घेतली जाते. काही प्रकरणांत तो अधिकारी तेथे नियुक्त नसतानाही त्या दिवसाची खोटी स्वीकृती बनवली गेली असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. बहुतांश इमारतींकडील बिगर शेती परवाने (एनए) बनावट आहेत. इमारतीच्या बांधकामाचे (सीसी) व निवासाचे (ओसी) परवाने एकतर उपलब्ध नाहीत किंवा असल्यास बनावट आहेत, अशी स्थानिकांची तक्रार आहे. इतकेच नव्हे तर रिअल इस्टेट रेग्युलेटरी अ‍ॅक्ट (रेरा) क्र मांकही नाही. या अनागोंदीकडे कानाडोळा करुन निबंधकांच्या कार्यालयात रेरा क्रमांकाशिवाय फ्लॅटचे करार बिनदिक्कत नोंदणीकृत केले जात आहेत. राजकीय नेते, सरकारी अधिकारी आणि कर्ज देणाºया बँका यांच्या संगनमताने रेरा कायद्याला पायदळी तुडवले जात आहे. ्रपरिणामी, मुख्यमंत्री फडणवीस यांचा ड्रीम प्रॉजेक्ट असलेल्या ग्रोथ सेंटरच्या स्थापनेवर होणार आहे. आता शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. चार वर्षांपूर्वी बनावट कागदपत्रांच्या आधारे अवैध इमारती उभारणाºयांचे एक रॅकेट या भागात उघडकीस आले होते. मात्र, त्या प्रकरणाची चौकशी अजूनही सुरू आहे. त्या सुनील गावडे प्रकरणाची चर्चा विधानसभेत झाली होती. काही काळ या रॅकेटला लगाम बसल्यानंतर आता परत अवैध बांधकामे फोफावली आहे. सरकारने गंभीर दखल घेतली असून कायद्याचा बडगा उगारणार आहे.

टॅग्स :thaneठाणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस