शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात साकारणार राज्यातील दुसरे माॅडेल करिअर सेंटर; केंद्र सरकारची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2020 06:59 IST

Thane : सध्याच्या कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे रूपांतर या मॉडेल करिअर सेंटरमध्ये करण्यात येणार आहे. यासाठी ४१ लाख ३२ हजार रुपये निधीही केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात मंजूर केला आहे.

- नारायण जाधव

ठाणे : देशातील युवकांच्या भविष्यातील प्रगतीच्या दृष्टीने त्यांना उत्तम कौशल्य प्राप्त करता यावीत, राेजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी केंद्रीय श्रम व रोजगार मंत्रालयाने राष्ट्रीय करिअर सेवा योजना मंजूर केली आहे. याअंतर्गत प्रत्येक राज्यात एक मॉडेल करिअर सेंटर स्थापन करण्याचे आदेश असून त्यानुसार महाराष्ट्रात यवतमाळ येथे जानेवारी २०१६ मध्ये असे एक सेंटर स्थापन केले आहे. आता सर्वाधिक नागरीकरण आणि औद्योगिकीकरण झालेल्या ठाणे जिल्ह्यातही राज्यातील दुसरे मॉडेल करिअर सेंटर स्थापन करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.सध्याच्या कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे रूपांतर या मॉडेल करिअर सेंटरमध्ये करण्यात येणार आहे. यासाठी ४१ लाख ३२ हजार रुपये निधीही केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात मंजूर केला आहे. ग्रामीण, स्थानिक, निमशहरी भागातील रोजगार इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधी, तंत्रज्ञानाचा वापर करून समुपदेशन करून प्रशिक्षण देणे हा या सेंटरचा उद्देश आहे.रोजगार आणि बाजार क्षेत्राचा अभ्यास करून रोजगार संधीचे अंदाज वर्तविणे, उमेदवारांचे त्यांचे कौशल्य, स्वारस्य आणि मागणीचा विचार करून समुपदेशन करणे, मागणीनुसार रोजगारक्षम व कौशल्ययुक्त मनुष्यबळाची सांगड घालणे, केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या विविध सेवासुविधांचा प्रचार व प्रसिद्धी देणे आदी सेवा करिअर सेंटरमार्फत देण्यात येणार आहेत. 

केंद्र व राज्य शासनाचा सहभागकरिअर सेंटर स्थापण्याकरिता समुपदेशकांची विविध प्रशिक्षणाद्वारे क्षमता बांधणी करणे, उमेदवारांना समुपदेशन व प्रशिक्षण देण्यासाठी अधिकाऱ्यांना मूल्यमापन किटसह हिंदी व स्थानिक भाषेत साहित्य पुरविणे, वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे निरसन करणे, अभिक्षमता चाचण्या घेणे, स्थानिक स्तरावर रोजगार मेळावे आयोजित करून उद्योजकांची सूची तयार करणे, तज्ज्ञांची मदत घेऊन अहवाल तयार करणे, वेबपोर्टल सुरू करणे, केंद्र शासनाच्या विविध रोजगाराभिमुख योजनांची माहिती पुरविणे, कॉल सेंटर सुरू करणे ही कामे केंद्र शासनाने करावयाची आहेत. तर राज्य शासनाने करिअर सेंटर आवश्यक निधी देणे, देखरेखीसाठी कौशल्य विकास विभागाच्या उपयुक्तांची नियुक्ती करून मनुष्यबळ पुरविण्याची जबाबदारी सोपविली आहे 

टॅग्स :jobनोकरीthaneठाणे