शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात एकाच दिवशी, एकाच वेळी पाच हजार विद्यार्थ्यांचे घुमणार वंदेमातरमचे सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 15:51 IST

ठाण्यात एकाच दिवशी, एकाच वेळी पाच हजार विद्यार्थ्यांचे वंदेमातरमचे सूर घुमणार आहे. यानिमित्ताने विद्यार्थ्यांचा आपापल्या शाळांत, महाविद्यालयांत सराव सुरू आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांसाठी ‘सामहिक संपूर्ण वंदेमातरम’ गायनाचा कार्यक्रम ठाणे शहरातील पाच हजार विद्यार्थी सहभागी होणारविद्यार्थ्यांना कार्यक्रमस्थळी ने - आण करण्यासाठी बसव्यवस्था

ठाणे: भगिनी निवेदिता उत्कर्ष मंडळाने भगिनी निवेदिता यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘सामहिक संपूर्ण वंदेमातरम’ गायनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. गुरूवार १४ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते ११ यावेळेत मॉडेला कंपाऊंड, मुलुंड चेकनाक्याच्या जवळ, ठाणे येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.     या कार्यक्रमात ठाणे शहरातील पाच हजार विद्यार्थी सहभागी होणार आहे. शाळांबरोबर महाविद्यालयांनी देखील यात सहभाग घेतला आहे. सरस्वती सेकंडरी स्कूल, डॉ. बेडेकर विद्यामंदिर, महाराष्ट्र विद्यालय, मो.ह. विद्यालय, ब्राह्ण विद्यालय, शिवसमर्थ विद्यालय, सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल, ज्ञानप्रसारणी विद्यालय, मनिषा विद्यालय, आर.जे. ठाकूर, श्रीराम विद्यालय, अनमोल, नानिक, पीपल्स एज्युकेशन, नाखवा, आनंद विश्वर गुरुकुल शाळा व महाविद्यालय, ज्ञानसाधना महाविद्यालय, जोशी बेडेकर महाविद्यालय अशा एकूण जवळपास २५ शाळा व महाविद्यालयांचा यात समावेश आहे. भगिनी निवेदिता या परदेशी स्त्री, स्वामी विवेकानंदांची शिष्या बनून जेव्हा भारतीय स्त्रीयांसाठी काम करायला आल्या, तेव्हा त्या वेळच्या प्रतिकूल परिस्थीतीमध्ये सुद्धा भारतीय स्त्री, भारतीय शिक्षण यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत, वंदे मातरमचा उच्चार आग्रहपुर्वक व्हावा यासाठी उचललेले आतोनात कष्ट हे आजच्या तरुणपिढीसमोर यावे यासाठी भगिनी निवेदिता उत्कर्ष मंडळाने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संपूर्ण वंदे मातरम शिकवून देशप्रेमाची भावना जागृत करण्यासाठी येत्या गुरूवारी हा कार्यक्रम आयोजित केला आहे असे मंडळाच्या डॉ. अश्विनी बापट यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी मंडळाच्या बापट यांच्यासह श्वेता गांगल, रोहिणी बापट, सुनंदा अमरावतकर, सुधा शिदये, मनिषा जोशी, प्रिया ढवळे या मेहनत घेत आहेत. विद्यार्थ्यांचा सराव त्यांच्या शाळांमध्येच सुरू आहे असे डॉ. बापट म्हणाल्या. विद्यार्थ्यांना कार्यक्रमस्थळी ने - आण करण्यासाठी मंडळाने बसव्यवस्था देखील केल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई