शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे आरपीएफ पोलिसांमुळे रेल्वे प्रवासात गहाळ झालेली लॅपटॉपची बॅग पुन्हा मिळाली सुखरुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 00:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : टिटवाळा उपनगरी रेल्वेमध्ये अमृता कवठणकर (२६) या महिलेची लॅपटॉप असलेली बॅग गहाळ झाल्याची माहिती ...

ठळक मुद्देप्रवासी महिलेने मानले आभार रेल्वेच्या हेल्पलाईनवर मागितली होती मदत

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: टिटवाळा उपनगरी रेल्वेमध्ये अमृता कवठणकर (२६) या महिलेची लॅपटॉप असलेली बॅग गहाळ झाल्याची माहिती ठाणेरेल्वे सुरक्षा दलाच्या जवांनाना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने या बॅगेचा शोध घेऊन कवठणकर यांना शनिवारी सुपूर्द केल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (सीएसएमटी) स्थानक येथे ३० जानेवारी रोजी सकाळी ११.२४ वाजताच्या टिटवाळा मार्गावरील धीम्या उपनगरी रेल्वेतील महिलांच्या बोगीमध्ये महिला प्रवाशाची लॅपटॉप असलेली बॅग विसरल्याची माहिती ठाणे स्थानकातील आरपीएफच्या पोलिसांना मिळाली. रेल्वेच्या १८२ या हेल्पलाईन क्रमांकावरुन ही माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक नवीन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली महिला अंमलदार सुजाता मालवीय यांनी या बॅगेचा शोध सुरु केला. संबंधित टिटवाळा उपनगरी रेल्वे दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी ठाणे स्थानकात आली. त्यावेळी या रेल्वेमध्ये ही काळया रंगाची बॅग मालवीय यांना मिळाली. बॅग मिळताच मुंबईतील बँकेत लेखाधिकारी असलेल्या अमृता कवठणकर (२६) यांना पाचारण करुन लॅपटॉप आणि पेन ड्राईव्हसह ही बॅग ओळख पटवून त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.* कवठणकर या शनिवारी दिवा ते सीएसएमटी असा प्रवास करीत होत्या. सकाळी ११.०८ वाजता त्यांची उपनगरी रेल्वे सीएसएमटी स्थानकात पोहचली. त्यावेळी लॅपटॉपची बॅग न घेताच त्या रेल्वेतून उतरल्या. त्यानंतर हीच उपनगरी रेल्वे टिटवाळयाकडून ११.२४ ला तिथून सुटल्यानंतर त्यांनी ही माहिती रेल्वेच्या हेल्पलाईनवर देऊन मदतीची मागणी केली. ही माहिती मिळताच ठाणे आरपीएफकडून त्यांना सकारात्मक मदत मिळाल्याने त्यांनी सिंग यांच्यासह त्यांच्या पथकाचे आभार मानले.

टॅग्स :thaneठाणेrailwayरेल्वेMissingबेपत्ता होणं