शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे : रस्ते दुरुस्तीची कामं हाती, एप्रिल महिन्यात शहरात वाहतुकीचे वाजणार तीन तेरा

By अजित मांडके | Updated: March 30, 2023 15:54 IST

पावसाळ्यात खड्डेमुक्त प्रवासासाठी हे प्रयत्न सुरु असल्याचं म्हटलं जातंय.

ठाणे : ठाणे शहरात महापालिका आणि विविध प्राधिकरणांच्या माध्यमातून रस्ते दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागात सध्या वाहतुक कोंडी होतांना दिसत आहे. परंतु आता मुंब्रा बायपास आणि साकेत, खारेगाव पुलावरील दुरुस्तीचे कामही आता हाती घेण्यात येणार आहे. पावसाळ्यात खड्डेमुक्त प्रवासासाठी हे प्रयत्न सुरु आहेत. परंतु आता शहरातील रस्त्यांबरोबर महामार्गावरील रस्त्यांची देखील दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने त्यामुळे शहरात वाहतुक कोंडीत आणखी भर पडणार असल्याचे दिसत आहे. परंतु वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज झाले असून ठाणे, नवी मुंबई महामार्ग पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ५८६ वाहतुक सहाय्यक उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच वाहतुक पोलीसांचे मनुष्यबळही यासाठी कार्यरत असणार आहे.

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील विविध भागात रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहे. शहरात ६०५ कोटींची कामे सुरु असून, त्यासाठी अनेक भागात खोदाई केली जात आहे. त्यामुळे शहरातील मध्यवर्ती भागासह अनेक भागात वाहतुकीचा वेग मंदावला आहे. त्यातही माजिवडा, कापुरबावडी, ब्रम्हांड येथील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी येथील काही मार्ग बंद करण्यात आले आहेत. परंतु तरी देखील कापुरबावडी येथे सांयकाळच्या सुमारास वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसत आहे.

दुसरीकडे आता साकेत खारेगाव पुल आणि मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीचे कामही आता हाती घेण्यात आले आहे. मुंब्रा बायपासचे काम १ एप्रिल तर साकेत येथील काम १० एप्रिल पासून सुरु होणार आहे. हे दोनही महामार्ग असल्याने याठिकाणी अवजड वाहनांची रेलचेल असते. पावसाळ्यात याच रस्त्यांवर खड्डे पडून वाहतुकीचा बट्याबोळ झाल्याचे दरवर्षी पहावयास मिळत आहे. त्यामुळे यंदा त्या कोंडी पासून ठाणेकर मुक्त व्हावेत यासाठी ही कामे हाती घेण्यात आली आहेत. परंतु त्याचा फटका आता ३१ मे पर्यंत वाहन चालकांना सहन करावा लागणार आहे.

प्रशासन सज्जपरंतु वाहतुक कोंडीचा फटका बसू नये यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ५८६ वाहतूक साहाय्यक तैनात असणार आहे. त्यापैकी ठाणे पोलिसांना २४०, नवी मुंबई पोलिसांना २४५ आणि उर्वरित महामार्ग पोलिसांना उपलब्ध केले जाणार आहेत.  याशिवाय ठाणे वाहतूक शाखेत सध्या ७०० पोलीस अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे वाहतूक नियंत्रण करण्यास या वाहतूक साहाय्यकांची मदत होणार आहे. तसेच मुख्यालयातूनही सुमारे १०० पोलीस कर्मचारी उपलब्ध असणार आहेत. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात एखादे वाहन बंद पडल्यास या वाहनांना बाजूला करण्यासाठी चार क्रेन, पाच हायड्रा रस्त्याकडेला उभ्या केल्या जाणार आहेत. अवघड वाहन चालकांना वाहतूक बदलाची माहिती मिळावी यासाठी ९२ ठिकाणी दिशादर्शक फलक आणि १० ठिकाणी अधिसूचना फलक बसविले जाणार आहेत.

टॅग्स :thaneठाणेTrafficवाहतूक कोंडी