शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे : कन्टेनमेंट झोनमध्ये निर्बंध कायम; शहरातील आठ ठिकाणी असणार नियम लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 20:12 IST

नियम शिथिल करण्याच्या दृष्टीनं ठाणे महानगपालिकेनं उचललं पाऊल. परंतु कन्टन्मेंट झोनमध्ये निर्बंध कायम राहणार.

ठळक मुद्देनियम शिथिल करण्याच्या दृष्टीनं ठाणे महानगपालिकेनं उचललं पाऊल.कन्टन्मेंट झोनमध्ये निर्बंध कायम राहणार.

ठाणे  : ठाणे  महापालिकेने मंगळवार पासून कोरोना बाबतीतील नियम शिथील करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. परंतु दुसरीकडे ज्या भागात आजही कोरोना रुग्ण वाढत आहेत. अशा ८ ठिकाणी नियम कडक असतील असे जाहीर करण्यात आले आहे. याठिकाणी पुढील १५ जून पर्यंत कडक लॉकडाऊन असणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. यामध्ये लोकमान्य नगर - सावरकरनगर प्रभाग समितीमधील काही भाग, कळवा आणि उथळसर आणि वागळेतील काही भागांचा समावेश किंवा इमारतींचा समावेश असून त्याच ठिकाणी कडक निर्बंध असतील असे पालिकेने स्पष्ट केले आहे.ठाणे  महापालिका हद्दीत मागील काही दिवसापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. शहरात आतापर्यंत १ लाख २८ हजार ८६९ करोना रु ग्ण आढळून आले आहेत. पैकी १ लाख २५ हजार ३६० रुग्णांनी कोरोनावर मात केली असून हे प्रमाण ९७.२८ टक्के एवढे आहे.  तर १ हजार ९१५ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तसेच सद्यास्थितीत शहरात १ हजार ५९४ सक्रीय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु  आहेत.सध्या ८ कन्टेन्मेंट झोनमहापालिका क्षेत्नातील करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पाचपेक्षा अधिक रुग्ण असलेल्या इमारती तसेच परिसरांना मायक्रो कन्टमेंट झोन म्हणून जाहीर करण्यास सुरूवात केली होती. त्यानुसार दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पालिका प्रशासनाने शहरातील १२७ मायक्रो कन्टमेंट झोन म्हणून जाहीर केले होते. या इमारती तसेच परिसरातील नागरिकांमुळे शहराच्या दुसऱ्या भागांमध्ये करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी ही उपाययोजना केली जात होती. परंतु आता ती संख्या देखील खाली आल्याचे दिसत आहे. त्यानुसार शहरात सद्यस्थितीत अवघे ८ कन्टेनमेंट झोन शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समितीमध्ये ३ ठिकाणी, कळव्यात दोन ठिकाणी, उथळसर दोन आणि वागळेतील एका ठिकाणी कन्टेमेंट झोन असणार आहे. त्यानुसार या भागात येत्या १५ जून पर्यंत निर्बंध असतील असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणेtmcठाणे महापालिका