शहरं
Join us  
Trending Stories
1
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
2
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
3
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
4
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
5
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
6
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
7
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
8
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
9
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
10
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
11
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
12
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
13
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
14
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
15
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
16
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
17
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
18
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
19
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
20
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'

ठाणे निवासी उपजिल्हाधिका सूर्यवंशींसह तीन प्रशासक बहिणींचा प्रेरणादायी प्रवास उलगडणार रविवारी

By सुरेश लोखंडे | Updated: March 8, 2018 19:25 IST

उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील... शिक्षक आईवडील.... तीन बहिणी... मागास, आदिवासी बहुल दुर्गम भागात झालेलं मराठी माध्यमातील शिक्षण.... तिघींनी आई विडलांच्या प्रोत्साहनाच्या जोरावर प्रशासकीय सेवेचा मार्ग निवडला आहे. वंदना सूर्यवंशी यांनी आतापर्यंत एमएमआरडीए, निवडणूक निर्णय अधिकारी, रेशनिंग अधिकारी आणि आता ठाण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी असा त्यांचा प्रवास

ठळक मुद्देएकाच घरातील या तिघी ‘सूर्यवंशी’ बहिणी प्रशासनाच्या अत्यंत महत्वाच्या पदावर समर्थपणे सेवा बजावत आहेतठाणे निवासी उपजिल्हाधिकारी (आरडीसी) वंदना सूर्यवंशीसह निलिमा आणि माधवी सूर्यवंशी या बहिणींची अद्भुत आणि प्रेरणादायी यशोगाथा‘महिला’ दिनाच्या निमित्ताने रविवारी ११ मार्च रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे सकाळी ११वाजता उलगडणार

ठाणे : एकाच घरातील या तिघी ‘सूर्यवंशी’ बहिणी प्रशासनाच्या अत्यंत महत्वाच्या पदावर समर्थपणे सेवा बजावत आहेत. येथील ठाणे निवासी उपजिल्हाधिकारी (आरडीसी) वंदना सूर्यवंशीसह निलिमा आणि माधवी सूर्यवंशी या बहिणींची अद्भुत आणि प्रेरणादायी यशोगाथा ‘महिला’ दिनाच्या निमित्ताने रविवारी ११ मार्च रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे सकाळी ११वाजता उलगडणार आहे.उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील... शिक्षक आईवडील.... तीन बहिणी... मागास, आदिवासी बहुल दुर्गम भागात झालेलं मराठी माध्यमातील शिक्षण.... तिघींनी आई विडलांच्या प्रोत्साहनाच्या जोरावर प्रशासकीय सेवेचा मार्ग निवडला आहे. वंदना सूर्यवंशी यांनी आतापर्यंत एमएमआरडीए, निवडणूक निर्णय अधिकारी, रेशनिंग अधिकारी आणि आता ठाण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी असा त्यांचा प्रवास आहे. कुणाचाही दबाव न जुमानता नियमांवर बोट ठेऊन काम करणारी अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. ‘निवासी उपजिल्हाधिकारी’ पदावर काम करणा-या त्या राज्यातील एकमेव महिला अधिकारीआहेत.निलिमा सूर्यवंशी यांचा नायब तहसीलदार म्हणून प्रशासनात प्रवेश झाला. भिवंडीत पुरवठा अधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. कुर्ल्यासारख्या संवेदनशील भागात अतिक्र मण विरोधी अधिकारी म्हणूनही त्यांनी धडक काम केले. कर्तव्य कठोर तरीही माणुसकीचा हळवा कोपरा जपणारी अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. महिला अधिका-यांचे हक्क, त्यांना मिळणााºया सुविधा यासाठी त्या आग्रही आहेत. सध्या झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणामध्ये तहसीलदार म्हणून त्या सेवा बजावत आहेत.याप्रमाणेच माधवी सूर्यवंशी गट विकास अधिकारी म्हणून त्यांची कारिकर्दी सुरु झाली. कुपोषणासंदर्भात त्यांनी केलेले काम अविस्मरणीय आहे. नंतर त्यांची विक्र ी कर विभागात निवड झाली. सहायक विक्र ी कर आयुक्त आणि आता विक्र ीकर उपयुक्त असा त्यांचा प्रवास आहे. सध्या त्या नव्या अधिका-यांना प्रशिक्षण देण्याचे काम करतात. विशेष म्हणजे हे काम त्यांनी स्वत:हून मागून घेतलेआहे. एकाच घरातील तिघी बहिणी प्रशासनात जाण्याचा हा दुर्मिळ योग. या तिघींचे घडवणारे त्यांचे आई वडील, त्यांचे बालपण, शिक्षण, प्रशासनात त्यांनी केलेला संघर्ष असा लखलखता प्रवास ठाण्यात उलगडणार आहे. ठाणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या वेगळ्या वाटेवरच्या मुलाखतीचा लाभ घ्यावा. 

टॅग्स :thaneठाणेcollectorतहसीलदार