शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांच्या नातेवाईकांकडून ब्रदर्स आणि दिव्यांग कर्मचाऱ्यास मारहाण, ठाणे जिल्हा रुग्णालयात डॉक्टर कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By अजित मांडके | Updated: April 27, 2024 13:58 IST

Thane News: ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील ब्रदर्स (परिचारक) आणि दिव्यांग कर्मचाऱ्याला शनिवारी पहाटेच्या सुमारास रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण करीत चाकूचा धाक दाखविल्याची घटना घडली. या घटनेचा निषेध करण्यासाठी डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी सकाळी ११ .०० वाजता आंदोलन केले.

- अजित मांडके ठाणे - ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील ब्रदर्स (परिचारक) आणि दिव्यांग कर्मचाऱ्याला शनिवारी पहाटेच्या सुमारास रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण करीत चाकूचा धाक दाखविल्याची घटना घडली. या घटनेचा निषेध करण्यासाठी डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी सकाळी ११ .०० वाजता आंदोलन केले. या घटनेच्या निमित्ताने पुन्हा एकदा सरकारी रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचार्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शनिवारी पहाटे ४.३० सुमारास वागळे इस्टेट येथील एका व्यक्तीस अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी त्या रुग्णास दाखल करून घेत, त्यावर उपचार सुरू केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर संतापलेल्या ५ ते ६ नातेवाईकांनी तेथे असलेल्या दिव्यांग वॉर्ड बॉय आणि ब्रदरला (परिचारक) मारहाण केली. तसेच चाकूच धाक दाखविला असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. या प्रकारामुळे सर्व कर्मचारी आणि डॉक्टर्स याच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच यावेळी ड्युटी वरील पोलीस हे हजर नव्हते, असे देखील रुग्णालय प्रशासनाने सांगितले. त्यामुळे या घटनेचा निषेध करण्यासाठी शनिवारी सकाळी ११ वाजता डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.

टॅग्स :thaneठाणेhospitalहॉस्पिटल