शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात १५१ मिमी पावसाची नोंद, १६ ठिकाणी तुंबले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 01:14 IST

गेले काही दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने गुरुवारी रात्रीपासूनच ठाणे शहरात दमदार हजेरी लावली.

ठाणे  - गेले काही दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने गुरुवारी रात्रीपासूनच ठाणे शहरात दमदार हजेरी लावली. या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला असून शहरातील १६ ठिकाणी पाणी तुंबल्याच्या घटना घडल्या. तर, घोडबंदर भागात वाहतूककोंडी झाल्याचे चित्र होते. गेल्या बारा तासांत शहरात सुमारे १५०.८८ मिमी पावसाची नोंद झाली. शहरात १३ ठिकाणी वृक्ष पडल्याच्या घटना घडल्या. एका घटनेत दोन गाड्यांवर वृक्ष पडले होते. तर, मुंब्य्रात धोकादायक इमारत रिकामी करण्यात आली. दुसरीकडे ठाणे रेल्वेस्थानकात रेल्वे ट्रॅकवरसुद्धा पाणी साचल्याने रेल्वेचा वेग मंदावला होता.शहरात शुक्र वारी सकाळी पावसाचा जोर वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे सकाळपासूनच रस्त्यावरील वाहतुकीचा वेग मंदावला होता. याचा फटका कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना बसला. सकाळपासून बरसणाºया पावसामुळे ठाणे रेल्वेस्थानकातील फलाट क्र मांक-४ आणि ५ या मुंबईच्या दिशेने जाणाºया ट्रॅकवर पाणी साचले होते. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणाºया गाड्या १० ते १५ मिनिटे उशिरा धावत होत्या.ठाण्यात दमाणी इस्टेट, बाराबंगला, वाघबीळनाका, कोर्टनाका आदी ठिकाणी वृक्ष पडून गाड्यांचे नुकसान झाले. तर, शहरातील मखमली तलाव, कामगार हॉस्पिटल, जलाराम अपार्टमेंट, साकेत रोड, उथळसर वॉर्ड आॅफिस, माजिवडानाका आदींसह वंदना, राममारुती रोड आदी १६ ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या. मुंब्य्रातील एक धोकादायक इमारत रिकामी करण्यात आली असून लुईसवाडी येथील एक रिकामी इमारत धोकादायक झाल्याने तिच्यावर कारवाई करण्यात आली. सकाळपासूनच सुरू असलेला पाऊस सायंकाळी उशिरापर्यंत कोसळतच होता. गेल्या बारा तासात शहरात १५०. ८८ मिमी पावसाची नोंद झाली. मागील वर्षी २८ जूनपर्यंत १०७५ मिमी पावसाची नोंद झाली होती. यंदा मात्र त्या तुलनेत अगदी कमी पाऊस झाला.

टॅग्स :Rainपाऊसthaneठाणे