शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

'राम काय खातो, यापेक्षा तुम्ही काय खाताय हे लक्षात आलंय', देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका

By जितेंद्र कालेकर | Updated: January 14, 2024 22:31 IST

Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray : प्रभू श्री रामाला ज्यांनी नाकारले, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे खरे वाघ होते. पण, उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबतच कुणीही खरे वाघ नाहीत, अशी टीका  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

- जितेंद्र कालेकर 

ठाणे - प्रभू श्री रामाला ज्यांनी नाकारले, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे खरे वाघ होते. पण, उद्धव ठाकरे आणित्यांच्यासोबतच कुणीही खरे वाघ नाहीत, अशी टीका  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. त्याचवेळी राम काय खातो, यापेक्षा तुम्ही काय खाताय हे लक्षात आलय, असा हल्लोबोलही  फडणवीस यांनी ठाण्यात राष्टÑवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर केला.

ठाणे येथील घोडबंदर भागातील आंनदनगर भागात रामकथा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला रविवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावून उपस्थितांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर कडाडून टीका केली. माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री असा माझा परिचय असला तरी माझा दुसरा परिचय त्यापेक्षा महत्त्वाचा आहे. तो म्हणजे रामसेवक आणि कारसेवक. अयोध्येला कारसेवक म्हणून मला वयाच्या २० व्या वर्षी रामाची सेवा करण्याची संधी मिळाली. मी कार सेवेला गेलो होतो, तेव्हा तुम्ही निसर्गाची फोटोग्राफी करत होता. तेव्हा कारसेवक छातीवर गोळ्या झेलून मंदिर इथेच बनविणार असे ठणकावून सांगत होते. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे खरे वाघ होते. पण, उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबतच कुणीही खरे वाघ नाहीत, अशी टीका फडणवीस यांनी केली.

अयोध्या कारसेवेत आमचे लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि इतर करसेवक होते. तुमच्या सोबत असलेला एकजण तरी कारसेवेत होता, हे दाखवून द्या, असे आव्हान त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिले. प्रभू श्री रामाला ज्यांनी नाकारले, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्याची  टीकाही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. तुमच्यात हिम्मत असेल तर २२ तारखेला मंदिर उदघाटन सोहळ्याला या.  नाकारलेल्या रामाला काय उत्तर द्यायचे हा प्रश्न त्यांना सतावत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. उद्धव ठाकरे म्हणतात माज्या वजनाने बाबरीचा ढाचा पडला असेल, पण त्यांना सांगू इच्छितो की, बाबरीचा ढाचा ही छोटी गोष्ट आहे. आम्ही रामसेवक असल्यामुळे आम्ही हिमालय पर्वत हलविण्याची ताकद ठेवतो, असेही ते म्हणाले.

राम काय खात होते हे सर्व बाजूला ठेवा पण, तुम्ही नक्की शेण खाता, हे आता आमच्या लक्षात आले आहे, अशी टीका त्यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर केली. रामायणमध्ये मंथरा होती, तसे उद्धव ठाकरे यांच्याकडेही मंथरा आहे. मंथरामुळे तुमचे काय होईल माहीत नाही, असा टोला लगावत त्यांनी संजय राऊत यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

ठाण्यातील कारसेवकांचा सत्कारश्रीरामजन्मभूमी आंदोलनात सहभागी कारसेवकांचा सत्कार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. त्यामध्ये मारुती शेळके, अंजली शेळके, प्रमोद घोलप, मोहन नाणे, अनिरुध्द साठ्ये, सुजित साठ्ये, डॉ. अंजली गांगल यांचा समावेश होता.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेthaneठाणे