शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात आज ‘महिलाराज’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 00:44 IST

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात ‘महिलाराज’ पाहण्यास मिळणार आहे.

- पंकज रोडेकर ठाणे : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात ‘महिलाराज’ पाहण्यास मिळणार आहे. या पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्व जबाबदाºया उद्या दिवसभर ४६ जणी समर्थपणे बजावताना दिसणार आहेत.या साऱ्यांनी दिवस व रात्र अशा दोन्ही शिफ्टमधील कामे वाटून घेतली आहेत. त्यामध्ये पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदारापासून गुन्ह्याचे एफआयआर नोंदणे, तपास आदी कामांचा समावेश आहे. त्यांचे पुरुष सहकारी हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसभर कार्यरत राहून त्यांना सहकार्य करणार असल्याची महिती सूत्रांनी दिली.शासकीय नोकरीमध्ये ३० टक्के महिलांना आरक्षण मिळाले आहे. मात्र, महिला दिनानिमित्त वरिष्ठ अधिकाºयांच्या आदेशानुसार, ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या (प्रभारी) वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांनी हा आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. ढाकणे यांच्यासह चार पोलीस हवालदार, पाच पोलीस नाईक आणि उर्वरित पोलीस शिपाई अशा ४६ जणी सद्य:स्थितीत लोहमार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. एरव्ही, ड्युटी लावण्यापासून गुन्ह्यांचा तपास आणि गुन्ह्यातील मुद्देमालांबाबतची कामे, गुन्ह्याचा पंचनामा आदी कामे महिला पोलीस करत असतात. ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याची हद्द सीएसएमटी ते कल्याण या मार्गावर कोपरी ते दिवा आणि कोकण रेल्वेमार्गावर दिवा ते क ळंबोली अशी असून लोकल प्रवासात मोबाइलचोरीचे प्रमाण अधिक आहे. मात्र, उद्या ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे संपूर्ण नियंत्रण केवळ महिलांच्याच हाती असेल. त्यामुळे ही आव्हानात्मक जबाबदारी पेलण्याकरिता या लोहमार्ग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस सिद्ध झाल्या आहेत. आतापर्यंत महिलांशी संबंधित गुन्ह्यांचा तपासाकरिता चार महिला पोलीस हवालदार तर मोबाइल, पाकीट व इतर चोरीच्या गुन्ह्यांचा तपास पाच महिला नाईक यांच्याकडे दिला जात असून त्यांच्याकडून त्या गुन्ह्यांचा व्यवस्थित तपास केला जात असल्याने उद्या ही सुवर्णसंधी महिला पोलिसांना लाभल्याची माहिती सूत्रांनी दिली.>‘‘महिलांनी गुन्ह्यांची उकल करण्याकरिता पुढे यावे, यासाठी वरिष्ठ अधिकाºयांनी दिलेल्या आदेशानुसार, हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे शुक्रवारी दिवसभर पोलीस ठाण्यात अंमलदारापासून पोलीस ठाण्यातील विविध कामांची सूत्रे महिला पोलिसांच्या हाती दिली जाणार आहेत. पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिलांना दिवस आणि रात्र अशा शिफटमध्ये कामे वाटण्यात आली आहेत.’’- स्मिता ढाकणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (प्रभारी), लोहमार्ग पोलीस ठाणे