शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दडपशाहीसह अपमानाविरोधात जिल्ह्यातील ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांचे ठाण्यात धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 19:04 IST

दिवाळीपूर्वी अमलबजावणी करण्याचे आश्वासन देणाऱ्यां  शिक्षण विभागाने अद्यापही कार्यवाही केली नाही. या दडपशाहीसह अपमानाविरोधात ठाणे जिल्ह्यातील सर्व प्राध्यापकांनी एकत्र येऊन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मंगळवारी धरणे आंदोलन छेडले.

ठळक मुद्देसतत तीन वर्षांपासून आंदोलनठाणे जिल्ह्यातील सर्व प्राध्यापकांनी एकत्र येऊन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मंगळवारी धरणे आंदोलन छेडले

ठाणे : सतत तीन वर्षांपासून आंदोलन करणाऱ्यां  ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्यांवर दिवाळीपूर्वी अमलबजावणी करण्याचे आश्वासन देणाऱ्यां  शिक्षण विभागाने अद्यापही कार्यवाही केली नाही. या दडपशाहीसह अपमानाविरोधात ठाणे जिल्ह्यातील सर्व प्राध्यापकांनी एकत्र येऊन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मंगळवारी धरणे आंदोलन छेडले.महाराष्ट राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या नेतृत्त्वाखाली हे राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने व धरणे आंदोलन छेडले जात आहे. त्यानुसार ठाणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या नेतृत्वाखाली येथील शासकीय विश्रामगृहासमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलकांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सूपुर्द केले.प्रलंबित मागण्या प्राप्त करून घेण्यासाठी या प्राध्यापकांनी छेडलेले हे दुसऱ्यां  टप्प्याचे आंदोलन होते. या आधी त्यांनी तालुकास्तरावर तहसीलदार कार्यालयांवर राज्यभर आंदोलन केले. या दुसऱ्यां  टप्यातही शासनास जाग न आल्यास या प्राध्यापकांनी आंदोलनाचा तिसरा टप्पा विभागीय पातळीवरील शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयाबाहेर करण्याचे निश्चत केले आहे. नविन पेन्शन योजना रद्दा करावी, त्त्वरीत अनुदान देण्यात यावे,शिक्षकांना नियुक्ती मान्यता देणे, वेतनासाठी आर्थिक तरतूद करणे, माहिती तंत्रज्ञान विषय अनिवार्य करून अनुदानित करणे,प्रचलित निकषांनुसार संच मान्यता करणे,कनिष् महाविद्यालयाचे प्रशासन स्वतंत्र करणे, २४ वर्ष सेवा झालेल्याना निवड श्रेणी देणे,शालार्थ प्रणालीत नविन नाव टाकण्याचे अधिकार पूर्वीप्रमाणे वेतन अधिक्षकाना द्यावे,एमएड, एमफील, पीचडीसाठी आवश्यक ते सर्व लाभ व सुविधा देण्यात यावे आदी मागण्यां या प्राध्यापकांकडून करण्यात आल्या आहेत. या आंदोलनाचे नेतृत्त्व संघटनेचे अध्यख प्राध्यापक दत्तात्रेय चितळे यांच्यासह शिवाजी जगताप, डी.एन.पाटील, प्रकाश माळी, चंद्रकांत शिरसागर, रवींद्र खरात, एन. वाय . वाघचौर, जितेंद्र आंबेकर प्रभाकर निकम, पुंडलिक नलावडे आदी प्राध्यापकांचा या आंदोलनात सक्रिय सहभाग आहे. 

टॅग्स :thaneठाणेcollectorतहसीलदार