शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खड्डे बुजविण्यासाठी ठाण्यात पॉलिमर तंत्रज्ञानाचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 02:51 IST

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कापूरबावडी उड्डाणपुलावरील खड्डे पॉलिमर तंत्रज्ञानाचा वापर करून बुजविण्यात आले.

ठाणे : मागील आठवड्यातच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे अत्याधुनिक तंत्रज्ञानांने बुजविल्यानंतर पाऊस पडल्याने पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे आता ते बुजवून कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कापूरबावडी उड्डाणपुलावरील खड्डे पॉलिमर तंत्रज्ञानाचा वापर करून बुजविण्यात आले. आता हे तंत्रज्ञान पाऊस कितपत टिकविणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे.मागील काही दिवस ठाण्यात झालेल्या जोरदार पावसाने शहरातील विविध भागात रस्त्यांना खड्डे पडले होते. त्यांच्या विरोधात आंदोलनेदेखील झाली. त्यानंतर पालकमंत्र्यांनी स्वत: रस्त्यावर उतरून ते बुजविले होते. यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला होता. तसेच आयुक्त संजीव जयस्वाल हेदेखील रस्त्यावर उतरले होते. त्यांच्या मार्फत सुद्धा खड्यांची डागडुजी करण्यात आली होती. भर पावसात ते बुजविणे शक्य नसल्यामुळे पेव्हर ब्लॉक आणि बांधकाम साहित्याद्वारे ते बुजविण्यात आले होते. मात्र, पावसामध्ये बांधकाम साहित्य वाहून गेल्याने त्याचठिकाणी पुन्हा खड्डे दिसू लागले आहेत.पावसाळ्यात बुजविलेले खड्डे पुन्हा उखडू नयेत म्हणून नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. गेल्या आठवड्यातमहापालिकेने मुंब्रा भागात अ‍ॅक्वा पॅच या नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ते बुजविले होते. तर कोपरी पूल येथे रेनकॉनच्या साहाय्याने आणि कॅसल मिल परिसरात पॉलिमर सिरॅमिक काँक्रि टच्या साहाय्याने ते बुजविले होते. त्यापाठोपाठ सोमवारी कापूरबावडी उड्डाणपुलावर पॉलिमर तंत्रज्ञानाचा वापर करून ते बुजविण्यात आले. या कामाची पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापालिकेचे शहर अभियंता अनिल पाटील आणि रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी या सर्वांनी पाहाणी केली. या पुलापाठोपाठ आता मंगळवारी शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवरील खड्डे पॉलिमर तंत्रज्ञानाचा वापर करून बुजविले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Potholeखड्डेthaneठाणे