शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेश येथून २० वर्षांपूर्वी हरवलेल्या व्यक्तीचा लागला शोध, ठाणे पोलिसांचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 00:25 IST

२० वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील फतेहपूरसिक्री येथून हरवलेल्या मोहंमद अहमद ऊर्फ दिल्ली बशीर शेख (३३) याचा शोध घेण्यात युनिट-१ च्या पथकाला शनिवारी यश आले.

ठाणे : कळवा येथील गोळीबार प्रकरणाचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडून शोध सुरू असताना २० वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील फतेहपूरसिक्री येथून हरवलेल्या मोहंमद अहमद ऊर्फ दिल्ली बशीर शेख (३३) याचा शोध घेण्यात युनिट-१ च्या पथकाला शनिवारी यश आले. त्यामुळे मुंबईतच राहणाऱ्या त्याच्या भावाशी भेट घडवून आणण्यात ठाणे पोलिसांना यश आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे.कळवा पूर्व येथील शिवाजीनगर भागातील वीर युवराज मेडिकलमध्ये दरोडा टाकण्यासाठी २८ डिसेंबर २०१९ रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास एका चोरट्याने मेडिकलचे शटर उचकटून शिरकाव केला. त्यानंतर, दुकानातील एका कर्मचाºयाचा खून करून या चोरट्याने तिथून पलायन केले. याच प्रकरणाच्या तपासातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा माहीम दर्गा, मुंबईपर्यंत वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अविराज कुºहाडे, समीर अहिरराव आणि पोलीस हवालदार आनंदा भिलारे आदींच्या पथकाने माग काढला. तेव्हा माहीम दर्गा परिसरात राहणाºया स्थानिक रहिवाशांनी या सीसीटीव्ही फुटेजमधील संशयित आरोपी हा दोन वर्षांपूर्वी माहीम दर्गा भागात राहणारा ‘दिल्ली’नामक व्यक्ती असल्याचा दावा केला. त्याच अनुषंगाने या पथकाने दिल्ली याचा बांद्रा, दादरसह इतर ठिकाणी शोध घेतला. तो काही दिवसांपूर्वी मुंबईच्या वाकोला परिसरातील ब्रिजखाली दिसल्याचे अनेक रहिवाशांनी सांगितले. त्याप्रमाणे वाकोला ब्रिज परिसरात त्याचा शोध घेतला असता, तो या भागात ४ जानेवारी रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ब्रिजखाली मिळाला. तो २० वर्षांपूर्वी मूळ गावाहून मुंबईत पळून आलेला होता. लहानपणी त्याच्या फतेहपूरसिक्री जिल्ह्यातील जनता (ता. बेनकी) येथून पळून आल्याचेही पोलिसांनी विश्वासात घेतल्यानंतर त्याने सांगितले. त्याने मूळगावी आईवडिलांकडे जाण्याचीही इच्छा या पथकाकडे व्यक्त केली. तेव्हा उत्तर प्रदेश येथील स्पेशल टास्क फोर्सच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्फतीने दिल्ली याच्या मूळ गावी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर, त्याचा मोठा भाऊ शफीक शेख (रा. शिवाजीनगर, गोवंडी, मुंबई) या परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर युनिट-१ च्या कार्यालयात बोलावून त्याची ओळख पटविण्यात आली.>जबाबदारी स्वीकारलीपोलिसांनी भेट घालून दिलेला मुलगा भाऊ असल्याचे शफिकने ओळखले. भावाचा सांभाळ करण्याचा शब्द दिल्यानंतर पोलिसांनी दिल्ली हुसेन याला भावाच्या ताब्यात दिले. मानवतावादी दृष्टिकोन जपल्याने नातेवाइकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.