शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे पोलीस ओडिशाला रवाना, २२ पेट्रोलपंपांची करणार तपासणी, एक पेट्रोलपंप नक्षलग्रस्त भागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 03:14 IST

पेट्रोलपंप घोटाळ्याप्रकरणी अटक केलेल्या तंत्रज्ञ टेक्निशियन यांच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार ठाणे गुन्हे शाखेचे एक पथक ओडिशाला रवाना झाले आहे. तेथे हे पथक सुमारे २२ पंपांची तपासणी करणार आहे.

ठाणे : पेट्रोलपंप घोटाळ्याप्रकरणी अटक केलेल्या तंत्रज्ञ टेक्निशियन यांच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार ठाणे गुन्हे शाखेचे एक पथक ओडिशाला रवाना झाले आहे. तेथे हे पथक सुमारे २२ पंपांची तपासणी करणार आहे. त्यातील एक पंप नक्षलग्रस्त भागात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.पेट्रोलपंपांवरील डिझेल-पेट्रोल डिस्पेन्सिंग युनिटमधील पल्सरकार्ड, मदरबोर्ड, कंट्रोलकडे की, पॅड यामध्ये फेरफार करून ग्राहकांना कमी डिझेल-पेट्रोल वितरित होत असल्याचे कारवाईत निष्पन्न झाले होते. त्यानुसार, महाराष्टÑातील २१ जिल्ह्यांत तर ओडिशा राज्यातील २ ठिकाणी अशा एकूण १७८ पेट्रोलपंपांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये ५ पेट्रोलपंपमालक-चालक, ६ मॅनेजर, ७ खासगी आणि ८ अधिकृत तंत्रज्ञ (टेक्निशियन), एक माजी सॉफ्टवेअर इंजिनीअर, एक मुख्य सूत्रधार आयसी बनवणारा, एक आयसी विक्री करणारा अशा एकूण २९ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी २३ जणांविरोधात कल्याण न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.दरम्यान, नुकत्याच ओडिशातून अटक केलेल्या खासगी तंत्रज्ञ डंबरूधर मोहंतो याच्या चौकशीत तेथील आणखी २२ पंपांची माहिती पुढे आली आहे. त्यातील एक नक्षलग्रस्त भागात आहे. मात्र, ते पेट्रोलपंप कुठे आणि नेमके कोणाचे आहेत, याबाबत गुप्तता ठेवण्यात आली आहे. त्या पंपांच्या तपासणीसाठी ठाणे शहर पोलिसांचे सहा जणांचे पथक ओडिशाला रवाना झाले आहे. त्यामुळे हा घोटाळा उत्तर प्रदेश, महाराष्टÑापाठोपाठ ओडिशामध्येही तितक्याच मोठ्या प्रमाणात झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच अहिरे याच्याकडून काही नवीन माहिती पुढे आली आहे. तेथेही तपासणी केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.मालकांना न्यायालयीन कोठडीहाजीमलंग रोडवरील सद्गुरू पेट्रोलपंपचे बाळाराम गायकवाड आणि काटई साई पेट्रोलपंपचे संजय कुमार सरजू प्रसाद यादव या दोघांना शुक्रवारी, तर रायगड येथील समर्थ कृपा पेट्रोलपंपाचे जयदास तरे यांना शनिवारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे एकूण २९ आरोपींपैकी २७ जणांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.तंत्रज्ञांना पोलीस कोठडीडंबरूधर याला शुक्रवारी न्यायालयाने दोन दिवसांची, तर शनिवारी विनोद अहिरे याला न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी दिली. या प्रकरणी या दोघांकडून आणखी माहिती पुढे येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.