शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
7
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
8
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
9
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
10
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
11
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
12
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
13
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
14
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
15
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
16
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
17
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
18
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
19
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 

ठाण्यातील मेडिकल चालकाच्या खुन्याला अखेर ठाणे पोलिसांनी केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 21:57 IST

ठाण्यातील कळवा येथील मेडिकलमध्ये चोरीसाठी शिरल्यानतर दुकानातील कामगारावर गोळी झाडून त्याचा खून करुन पसार झालेल्या सर्फराज अन्सारी ( रा. नाशिक) याला अखेर २४ दिवसांनी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने २० जानेवारी रोजी अटक केली आहे. त्याला नाशिक पोलिसांनी आर्म अ‍ॅक्टच्या गुन्हयात याआधी अटक केली होती.

ठळक मुद्दे ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई आर्म अ‍ॅक्टच्या गुन्हयात नाशिक पोलिसांनी केली होतीआडगाव आणि नाशिक सह अनेक ठिकाणी चोरीचे गुन्हे

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कळव्याच्या शिवाजीनगर येथील मेडिकलमध्ये चोरीसाठी शिरकाव करून प्रेमसिंग राजपुरोहित (२६) या मेडिकल चालकावर गोळीबार करून त्याचा खून करणाऱ्या सर्फराज अन्सारी (२६, रा. नाशिक) याला ठाणे पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्याला २८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.अन्सारी हा सराईत चोरटा असून त्याच्याविरुद्ध नाशिक, मालेगाव, चांदवड, आडगाव आदी पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. त्याने २८ डिसेंबर रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने कळव्यातील वीर युवराज या मेडिकल दुकानातील प्रेमसिंग याच्यावर गोळीबार करून त्याचा खून केला होता. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकसह ठाण्यातील गुन्हे अन्वेषण विभागाची सर्वच पथके या तपासासाठी कार्यरत होती. सीसीटीव्हीतील आरोपीचा फोटो महाराष्टÑभर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने पाठविला होता. याच फोटोची पडताळणी आडगाव येथील दोन संशयित महिलांकडे अचानक समोर दिसलेल्या नाशिक गुन्हे मध्यवर्ती शोध पथकाने केली. त्याच चौकशीतून गावठी पिस्टल, तीन काडतुसे आणि चोरीतील एका मोटारसायकलसह त्याला १६ जानेवारी २०१९ रोजी अटक केली. त्याच्याविरुद्ध आर्म अ‍ॅक्टनुसार आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला नाशिक न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिल्यामुळे त्याची रवानगी नाशिक जिल्हा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. ठाणे पोलिसांनी नाशिक न्यायालयाच्या मार्फतीने सर्फराज याला ठाण्याच्या खून प्रकरणात त्याचा ताबा मागितला. ही मागणी मान्य झाल्यानंतर त्याला २० जानेवारी रोजी नाशिक जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक दतात्रय सरक, पोलीस हवालदार सुभाष मोरे, पोलीस नाईक आशिष ठाकूर आणि भगवान हिवरे आदींच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याने आणखी किती ठिकाणी चोºया केल्या आहेत, याचीही कसून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक