शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

संशयीत आरटीआय कार्यकर्त्यांच्या कारवाईसाठी महापालिकेने दिले ठाणे पोलिसांना पत्र, सखोल चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 19:33 IST

वारंवार माहिती अधिकारात माहिती मागविणाºया काही कार्यकर्त्यांच्या विरोधात अखेर ठाणे महापालिकेने पोलिसांना एक निवेदन सादर केले आहे. या निवेदनाद्वारे संबधींतावर चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी पालिकेने केली आहे.

ठळक मुद्देमाहिती अधिकार कार्यकर्ते आले अडचणीतकाही माहिती अधिकार कार्यकर्त्यांची साखळी कार्यरत

ठाणे - आरटीआय कार्यकर्त्यांच्या बाबतीत केलेल्या अभ्यासात काही महत्वाच्या बाबी निर्दशनास आल्या आहेत. काही कार्यकर्ते माहिती मागवितात आणि त्याच माहितीच्या आधारे न्यायालयात याचिका करणारा दुसराच असतो, काही वेळेस केस मागे घेतली जाते, काही जण एकाच विभागात एकाच विषयासाठी वारंवार अर्ज करीत असल्याचेही निदर्शनास आले होते. त्यानंतर आता या माहिती अधिकार कार्यकर्त्यांची भुमिका ही संशयीत आणि ब्लॅकमेलींग स्वरुपाची वाटत असल्याचा निष्कर्ष पालिकेने काढला आहे. त्यानुसार या प्रकरणात सखोल चौकशी करुनस संबधींतावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची महापालिकेने ठाणे पोलिस आयुक्तांकडे केली आहे.                         विधानसभेत झालेल्या आरटीआय कार्यकर्त्यांच्या लक्षवेधीच्या अनुषंगाने मागील वर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या ठाणे महापालिकेच्या महासभेत देखील हा मुद्दा चर्चेचा विषय झाला होता. आरटीआय कार्यकर्त्यांना पालिकेत काही अधिकारी अशा कार्यकर्त्यांचे जास्त मनोरंजन करतात, त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई कशा पध्दतीने होऊ शकते याचा विचार करण्याची गरज असल्याचे मत काही नगरसेवकांनी व्यक्त केले होते. तर या माहिती अधिकार कार्यकर्त्यांना कितपत माहिती द्यावी, कोणती माहिती देऊ नये, एक कार्यकर्ता कितीवेळा माहिती मागतो, याचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे मतही काही नगरसेवकांनी व्यक्त केले होते.                 विधानसभेत झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महासभेत देखील यातील काही बाबी सभागृहाच्या निदर्शनास आणल्या. प्रशासनाच्या वतीने मागील महिनाभर अशा आरटीआय कार्यकर्त्यांचा अभ्यास सुरु होता. त्यातून काही महत्वाच्या बाबी निदर्शनास आल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. एखादा व्यक्ती वारंवार एका विभागात एकाच विषयासाठी प्रश्न विचारतात, माहिती घेणारे आणि न्यायालयात जाणारे हे दुसरेच असतात, काही व्यक्तीतर एकाच विभागात सुमारे ६० हून अधिक अर्ज टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे, न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर, कालांतराने ती मागेही घेतली जाते. त्यामुळे अशांच्या बाबतीत शंका उपस्थित राहत आहेत. आरटीआय अंतर्गत अर्ज करण्याबाबत माझा विरोध नसल्याचेही आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. परंतु, अशा पध्दतीने एकाच विभागात अर्ज करुन त्रास देणे चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे यावर पोलिसांशी सल्लामसलत करुन, कायदेशीर बाबींचा तपास करुन नियमानुसार कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले होते.दरम्यान त्या नंतर आता अशा वारंवार तक्रारी दाखल करणाºयांमध्ये सुधीर बर्गे, राजकुमार यादव, संजय घाडीगावकर, आनंद पारगांवकर, राजेश मारे, ईराकी आरीफ, रामभाऊ तायडे, प्रदीप पाटील, शौकत मुलानी, मुकेश कनकिया आदींचा समावेश असल्याचे पालिकेने पोलिस आयुक्तांना दिलेल्या पत्रात या नावांचा उल्लेख केला आहे. या व्यक्तींचा हेतू स्पष्टपणे संशयीत व ब्लॅकमेलींगच्या स्वरुपात असल्याचा निष्कर्ष देखील पालिकेने काढला आहे. या व्यक्तींचे या अनियमित कृतीबाबत सविस्तर माहिती संबधींत विभागाकडून तयार करण्यात आली असून, त्या अनुषंगाने सविस्तर माहिती व्यक्ती व कामनिहाय माहिती तयार करण्यात आली असून ती या पत्राबरोबर पालिकेने पोलीसांना दिली आहे. विशेष म्हणजे या सर्व प्रकरणात यापैकी काही व्यक्तींची एक साखळी कार्यरत असल्याचा निर्ष्कष देखील पालिकेने काढला आहे. त्या अनुषंगाने या सर्वांची सखोल चौकशी करुन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी या पत्राद्वारे पालिकेने पोलिसांना केली आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता