शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाववरून कल्याण स्टेशनवर आलेल्या मुलास ठाणे पोलिसांनी सुखरूप सोडले घरी

By अजित मांडके | Updated: October 1, 2022 15:24 IST

Thane News: ठाणे चाईल्ड प्रोटेक्शन युनिटच्या पथकाने आणखी एका हरवलेल्या मुलाची त्याची घरच्यांबरोबर भेट घडवून आणली आहे. मालेगाव येथून हरवलेल्या व कल्याण स्टेशनवर रेल्वे पोलिसांना मिळून आलेल्या १० वर्षीय मुलाची ठाणो पोलिसांनी त्याच्या पालकांशी भेट घडवून आणली.

- अजित मांडके ठाणे :  ठाणे चाईल्ड प्रोटेक्शन युनिटच्या पथकाने आणखी एका हरवलेल्या मुलाची त्याची घरच्यांबरोबर भेट घडवून आणली आहे. मालेगाव येथून हरवलेल्या व कल्याण स्टेशनवर रेल्वे पोलिसांना मिळून आलेल्या १० वर्षीय मुलाची ठाणो पोलिसांनी त्याच्या पालकांशी भेट घडवून आणली. रेल्वे पोलिसांनी त्याला उल्हासनगर येथील बाल सुधारगृहात दाखल केले होते. मात्र त्याच्या मुलाच्या पालकांचा शोध घेऊन त्यास त्यांच्या स्वाधीन करण्यात चाईल्ड प्रोटेक्शन युनिटला यश आले आहे.

मालेगाव, नवापुरा वार्ड परिसरात राहणारा रिहान उर्फ रेहान अब्दुल करीम शेख हा १० वर्षीय मुलगा मालेगाव येथून हरवला होता. तो थेट कल्याण येथे पोहचला होता. कल्याण रेल्वे स्थानकावर हा मुलगा रेल्वे पोलिसांना मिळून आला. पोलिसांनी त्याला उल्हासनगर येथील बाल सुधारगृहात दाखल केले. त्याच दरम्यान ठाणे चाईल्ड प्रोटेक्शन युनिटच्या पथकास या मुलाची माहिती मिळाली. त्यांनी संस्थेत जाऊन या मुलाची भेट घेऊन त्याच्या पालकांबाबत माहिती विचारली असता तो मालेगाव येथे राहत असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर चाईल्ड प्रोटेक्शन युनिटच्या पथकाने मालेगाव तालुक्यातील पोलीस ठाण्यांमध्ये संपर्क साधून हा मुलगा मिसिंग असल्याची तक्र ार दाखल आहे का याची पडताळणी केली. मात्र कुठेही मिसिंगची तक्रार नसल्याचे दिसून आले.

दरम्यान पोलिसात मिसिंग तक्रार दाखल नसल्याची माहिती समोर आल्यानंतर ठाणो चाईल्ड प्रोटेक्शन युनिटच्या पथकाने मिसिंग मुलांच्या माहितीसाठी चालवण्यात येणा:या व्हाट्सएप ग्रुपवर या मुलाची माहिती प्रसारित केली. एका ग्रुप मध्ये हा मुलगा मालेगाव येथून हरवला असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलीस पथकाने मुलाच्या पालकांचा शोध घेऊन त्यांच्याशी संपर्क केला. मुलाच्या पालकांनी ठाण्यात येऊन या मुलाची नुकतीच भेट घेतली.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेkalyanकल्याणthaneठाणे