शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शिवीगाळ केल्याच्या रागातून ठाण्यातील ‘त्या’ सफाई कामगाराचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 22:27 IST

क्षुल्लक कारणावरुन अनिल गाडेकर (२७) या सफाई कामगाराचा खून करणाऱ्या सनी ऊर्फ गब-या मोरे याला वर्तकनगर पोलिसांनी अखेर चार दिवसांनी अटक केली.

ठळक मुद्देवर्तकनगर पोलिसांनी केली खुन्याला अटकगुन्हे अन्वेषण विभागाकडूनही सुरु होता तपास९ सप्टेंबर रोजी झाले होते भांडण

ठाणे : शिवीगाळ केल्याच्या रागातून भीमनगर येथील अनिल गाडेकर (२७) या सफाई कामगाराचा खून करणा-या सनी ऊर्फ गब-या मोरे याला वर्तकनगर पोलिसांनी अखेर चार दिवसांनी गुरुवारी अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली. त्याला १९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.भीमनगर भागातील एका सार्वजनिक शौचालयाच्या बाहेर अनिल याचा खून केल्याची घटना १० सप्टेंबर २०१८ रोजी पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान घडली. वर्तकनगर पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभागाकडूनही या प्रकरणाचा तपास सुरू होता. पोखरण रोड क्रमांक-२ भागातील रेप्टाकोर्स कंपनीमध्ये सफाई कामगार असलेल्या अनिल याला दारूचेही व्यसन होते. पण, नेमके मारेकरी कोण, याचा काहीच धागादोरा लागत नव्हता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर यांनी यासाठी तीन पथके तयार केली होती. १५ ते २० संशयितांकडे चौकशी करून घटनास्थळाजवळचे सीसीटीव्ही फुटेजही तपासले होते. ९ सप्टेंबर रोजी रात्री सन्नी ऊर्फ गब-या मोरे याचे दोन मुलांबरोबर भांडण झाले होते. घटना घडल्यापासून गब-या पसार झाला असल्याची टीप शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांना मिळाली. याच माहितीच्या आधारे गब-यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. १३ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वा.च्या सुमारास हाजुरी पाइपलाइन येथे पगाराचे पैसे घेण्यास तो येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर गायकवाड यांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. ९ सप्टेंबर रोजी गप्पा मारतानाच अनिलने शिवीगाळ केल्याच्या रागातून त्याच्या गळ्यावर चाकूने वार करून त्याचा खून केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. आरोपीबाबत कोणताही धागादोरा नसताना सलग चार दिवस मेहनत घेऊन खुनाचा छडा लावणाºया तपास पथकाचे उपायुक्त अंबुरे यांनी विशेष कौतुक केले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMurderखून