शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याच्या नाटकाने मुंबईत मारली बाजी, राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा मुंबई (१) केंद्रातून आदिम प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 16:23 IST

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ६ नोव्हेंबरपासून या स्पधेच्या प्राथमिक फेरीस सुरूवात झाली असून ठाण्याच्या अदिम नाटकाने मुंबईत बाजी मारली आहे.

ठळक मुद्देसांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित स्पर्धेची प्राथमिक फेरी संपन्न‘आदिम’ या नाटकाला प्रथम पारितोषिक प्राप्त अंतिम फेरीच्या सरावाचा श्री गणेशा तारिख जाहीर झाल्यानंतर

ठाणे: ५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत मुंबई (१) केंद्रातून स्वा. वि. दा. सावरकर प्रतिष्ठान, ठाणे या संस्थेच्या ‘आदिम’ या नाटकाला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. सोमवारी मुंबई (१) केंद्राचा निकाल जाहीर करण्यात आला. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित स्पर्धेची प्राथमिक फेरी संपन्न झाली.        प्राथमिक फेरीतून मुंबई (१) केंद्रातून ठाण्याच्या आदिम नाटकाने मुंबईत बाजी मारली आहे. या नाटकाची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. या नाटकाचे लेखन लेखा त्रैलोक्य, दिग्दर्शन दुर्गेश आकेरकर, नेपथ्य कल्पेश पाटील, प्रकाशयोजना योगेश केळकर, संगीत सुनिता फडके, वेशभूषा वंदना परांजपे, रंगभूषा केदार ओटवणेकर, रंगमंच व्यवस्था गजानन साप्ते यांची आहे. नम्रता सावंत (चंदा), राधिका भट (वसु), नेहा पाटील (बेला), सुनिल तांबट (सुहास) या कलाकारांनी यात भूमिका केली आहे. या प्राथमिक फेरीत सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचे द्वितीय पारितोषिक दुर्गेश आकेरकर, सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजनाचे प्रथम पारितोषिक योगेश केळकर, अभिनयाचे रौप्य पदक नम्रता सावंत व सुनिल तांबट तर अभिनयाचे प्रमाणपत्र राधिका भट यांना प्राप्त झाले आहे. अडीच तासांचे हे नाटक स्त्री - पुरूष नातेसंबंधावर आधारीत आहे. गेली दोन महिने या नाटकाचा सराव केला होता. अंतिम फेरीच्या सरावाचा श्री गणेशा तारिख जाहीर झाल्यानंतर करणार असल्याचे या नाटकाचे दिग्दर्शक आकेरकर यांनी सांगितले. आकेरकर यांनी दिग्दर्शन केलेले हे दुसरे नाटक आहे याआधीही राज्य नाट्य स्पर्धेत त्यांच्या मस्तानी नाटकाने ठाणे केंद्रातून बाजी मारत प्रथम क्रमांक पटकाविला होता. ६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत साहित्य संघ मंदिर, गिरगाव, मुंबई येथे या स्पर्धेत एकूण २० नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून सुहास जोशी, रवि फलटणकर, सुनिता पाटणकर यांनी काम पाहिले.

 

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई