शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

Thane: ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वीय सहाय्यक पल्लवी सरोदे यांचे अपघाती निधन

By सुरेश लोखंडे | Updated: March 23, 2025 19:43 IST

Thane News: ठाणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी तथा ठाणे जिल्हाधिकारी अशाेक शिनगारे यांच्या स्वीय सहाय्यक पल्लवी सरोदे (३७) यांचे रविवारी हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर अपघाती निधन झाले.

- सुरेश लोखंडे ठाणे - येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी तथा ठाणे जिल्हाधिकारी अशाेक शिनगारे यांच्या स्वीय सहाय्यक पल्लवी सरोदे (३७) यांचे रविवारी हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर अपघाती निधन झाले. कार्यालयीन मैत्रिणींसह त्या या ठिकाणी सहली निमित्त गेल्या होत्या. तेथील समुद्रकिनारी त्या लाटेत अचानक ओढल्या गेल्या, त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना ठाणे जिल्हा प्रशासनातील सर्वांच्याच मनाला चटक लावून गेली. आमच्या कुटुंबातील सतत हसत मुख व्यक्ती गेल्यामुळे तीव्र दु:ख झाल्याची भावना जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

ठाणे जिल्हा प्रशासनात २०१२ रोजी लिपिक या पदावर पल्लवी रुजू झाल्या होत्या. वर्षेभरापूर्वी मार्चमध्ये त्यांना सहाय्यक महसूल अधिकारी पदावर पदोन्नती मिळाली होती. त्या सध्या जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत होत्या. ठाणे जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांशी अत्यंत सलोख्याचे संबंध असलेल्या, सर्वांना हसत मुखाने सर्व प्रकारची मदत करणाऱ्या, अतिशय सुस्वभावी, मेहनती, प्रामाणिक, कामात तत्पर, चेहऱ्यावर कायम स्मित हास्य असलेल्या पल्लवी सरोदे यांच्या अकाली मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सरोदे यांच्या मृत्यूपश्चात त्यांचे पती, सासू- सासरे आणि त्यांचा १३ वर्षाचा मुलगा आहे.

पतीला मदत करणाऱ्यांचे आभार मानायचे हाेते त्यांचे पती काेकणाताील गांवी गणपतीसाठी गेले असता प्रवासात त्यांना ह्रदय विकाराचा झटका येऊन ते पडले हाेते. त्यावेळी त्यांना अन्य प्रवाश्यांनी वेळीच मदत करून रूग्णालयात दाखल केले. या संकटातून ते सुखरूप बचावले हाेते. दरम्यान या भयानक संकटात पतीला मदत करणाऱ्यां प्रवाशांना मला कसे भेटता येईल, त्यांचे मला आभार मानायचे आहे, अशी इच्छा त्यांनी त्यांच्या निकटवर्तीयांकडे व्यक्त केली हाेती

टॅग्स :thaneठाणेAccidentअपघात