शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे-पालघरच्या २४ हजार शेतकऱ्यांना ७३ कोटींचे कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 02:38 IST

यंदाच्या खरीपातील पीककर्जासाठी १८० कोटींच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित केलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (टीडीसीसी) आतापर्यंत ठाणे व पालघर जिल्ह्यातील सुमारे २४ हजार ३६३ शेतकºयांना ७२ कोटी ७८ लाख रूपयांचे पीककर्ज वाटप केले आहे.

ठाणे : यंदाच्या खरीपातील पीककर्जासाठी १८० कोटींच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित केलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (टीडीसीसी) आतापर्यंत ठाणे व पालघर जिल्ह्यातील सुमारे २४ हजार ३६३ शेतकºयांना ७२ कोटी ७८ लाख रूपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. शेतकºयांनी या कर्जाचा लाभ मोठ्याप्रमाणात घ्यावा, यासाठी सुमारे नऊ दिवस दोन्ही जिल्ह्यात शेतकºयांचे मेळावे आयोजित करून जनजागृती केली जात आहे. यानुसार शहापूर तालुक्यातील किन्हवली येथे गुरूवारी पहिला मेळावा घेतल्याचे टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी सांगितले.ठाणे व पालघर जिल्ह्यात प्रत्येकी ९० कोटींचे पीककर्ज वाटप शेतकºयांना होणार आहे. यापैकी आतापर्यंत ठाणे जिल्ह्यात ४३ कोटी २२ लाखांच्या पीककर्जाचा लाभ सुमारे १६ हजार ४६ शेतकºयांना मिळाला आहे. सुमारे ४८ टक्के कर्ज वाटप झालेल्या शेतकºयांमध्ये नियमित कर्ज भरणाºया नऊ हजार ३३२ शेतकºयांचा समावेश आहे. त्यांना १२ कोटी ८९ लाखांचे कर्ज मिळाले आहे. तर कर्जमाफी मिळालेल्या सहा हजार ७१४ शेतकºयांना ३० कोटी ३३ लाखांच्या कर्जाचा लाभ झाला आहे. याप्रमाणेच पालघर जिल्ह्यात तीन हजार ४४५ कर्जमाफी मिळालेल्या शेतकºयांना २० कोटी ६८ लाखांचे पीक कर्ज मिळाले आहे. तर नियमित कर्ज भरणाºया चार हजार ८७२ शेतकºयांना आठ कोटी ८८ लाखांचे पीक कर्ज वाटप केल्याचा दावा टीडीसीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) भगीरथ भोईर यांनी केला आहे.२९ जूनला वसईच्या शिरसाडफाटा येथील जैन मंदिर व पालघरच्या काँग्रेस भवन सभागृहात शेतकरी मेळावा आयोजिला आहे. तर ३० जूनला विक्रमगडचे श्री औसरकर सभागृह व डहाणू तालुक्यातील कासा येथील बँकेच्या सभागृहात मेळावा होणार आहे. यानंतर २ जुलैला मुरबाड बाजार समिती, ३ जुलैला भिवंडीच्या दुगाडफाटा येथील सत्संग सभागृह, ४ ला जव्हार - मोखाड्यासाठी जव्हारच्या बँक शाखा सभागृहात व ६ ला कल्याणच्या नालिंदीगांव भिसोळे येथे मेळावा आहे. याशिवाय ७ जुलैला तलासरीच्या आमगांव ग्रा.पं.मध्ये, ९ जुलैला अंबरनाथच्या बेलवली बँक शाखेत व ठाणेच्या कल्याण शीळफाटा दत्त मंदिर सभागृहात शेतकरी मेळावा आहे.