शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील महामार्गांवरील वाहतूक कोंडी थांबवण्यासाठी अवजड वाहनांना ठेवणार वेटींगवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 18:45 IST

येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज शिंदे यांनी रस्त्यांची दुरावस्था आणि वाहतूककोंडी या विषयावर खास बैठक घेतली. रस्त्यांवरील खड्डे व सुरू असलेली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. नवरात्रोत्सव सुरू होण्या आधी न भरल्यास संबंधीतांवर निलंबनाची कारवाई करण्याचे संकेतही शिंदे यांनी यावेळी दिले. यामुळे अधिकाऱ्यांना खड्डे युध्दपातळीवर भरण्याची कारवाई करावी लागणार आहे. तर वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी जेएनपीटीकडून येणारी अजवड वाहने त्यांच्याकडे असलेल्या भूखंडावर रोखायची . यानंतर ती टप्याटप्याने सोडायचे.

ठळक मुद्देअनावश्यक असलेले बॅरीकेट्स हलविण्यात यावेत तात्काळ खड्डे न भरल्यास पथकर बंद करू नवरात्रोत्सव सुरू होण्या आधी खड्डे न भरल्यास संबंधीतांवर निलंबनाची कारवाई

ठाणे : ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील रस्त्यांची पावसामुळे दुरावस्था झाली आहे. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. नवरात्रोत्सवापूर्वी जिल्ह्यातील रस्त्यांवरी खड्डे भरण्याची तंबी सार्वजनिक बांधकाम व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधीत यंत्रणांना दिली. तर महामार्गांवर होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी अवजड वाहने ठिकठिकाणी थांबवून ते काही वेळेनंतर टप्या टप्याटप्याने सोडण्याचे आदेशही त्यांनी यावेळी वाहतूक नियंत्रण विभागास दिले.येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज शिंदे यांनी रस्त्यांची दुरावस्था आणि वाहतूककोंडी या विषयावर खास बैठक घेतली. रस्त्यांवरील खड्डे व सुरू असलेली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. नवरात्रोत्सव सुरू होण्या आधी खड्डे न भरल्यास संबंधीतांवर निलंबनाची कारवाई करण्याचे संकेतही शिंदे यांनी यावेळी दिले. यामुळे अधिकाऱ्यांना खड्डे युध्दपातळीवर भरण्याची कारवाई करावी लागणार आहे. तर वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी जेएनपीटीकडून येणारी अजवड वाहने त्यांच्याकडे असलेल्या भूखंडावर रोखायची . यानंतर ती टप्याटप्याने सोडायचे. यामुळे घोडबंदर महामार्गासह अन्यही रस्त्यावर जाणाऱ्यां या वाहनांपासून वाहतूक कोंडी होणार नसल्याचे शिंदे यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करते वेळी स्पष्ट केले.       पालघर कडून घोडबंदर, अहमदाबाद महामार्गावरून येणाऱ्यां अजवड वाहनांना रोखण्यासाठी व नाशिक महामार्गावरील अवजड वाहनांना रोखण्यासाठी मोठे भूखंडांचा तत्काळ शोध घेण्याचे आदेशही त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिले. या भूखंडावर ही अवजड वाहने थांबवण्यात यावी आणि त्यानंतर ती टप्याटप्याने महामार्गांवर सोडावी असे निर्देश शिंदे यांनी वाहतूक नियंत्रण विभागास दिले. यासाठी पडघ्या जवळ किंवा शहापूर, मुरबाड परिसरात भूखंड शोधण्याचे निर्देश ही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, जेनपीटी, महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हाप्रशासन आदी यंत्रणांनी समन्वय साधून वाहतूक कोंडीवर एकित्रत पणे उपाययोजना कराव्यात असेही त्यांनी सांगितले.         वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहनांच्या संदर्भात वाहतूक विभागाने काढलेल्या अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी करावी असे आदेश शिंदे यांनी दिले.या बैठकीस पालघर, रायगडचे पालकमंत्री तथा,बंदरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री, रवींद्र चव्हाण, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ अध्यक्ष प्रकाश पाटील, आमदार संजय केळकर, शांताराम मोरे, बाळाराम पाटील, बालाजी किणीकर, सुभाष भोईर,ज्योती कलानी, जिल्हाधिकारी ठाणे श्री राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी रायगडचे विजय सूर्यवंशी, पालघर जिल्हाधिकारी कैलास शिंदे आदीं सर्व संबंधित यंत्रणांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.         ठाणे शहरामध्ये येणारे रस्ते आणि बाहेर जाणारे रस्ते यावर होणाºया वाहतूक कोंडीची कारणे आणि त्यावर संबंधित यंत्रणेकडून करण्यात येणाºया उपाययोजनेचा यावेळी शिंदे आणि चव्हाण यांनी आढावा घेत यंत्रणाना धारेवर धरले. ठाणे वाहतूक विभागाने काढलेल्या अधिसूचनेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. यासाठी जेनपीटी मध्ये असलेल्या वाहनतळाचा तात्काळ वापर सुरु करण्यात यावा, रायगड जिल्हाधिकारी यांनी यामध्ये लक्ष घालून त्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी अशा सूचना शिंदे केल्या. तसेच सिडकोकडे असलेली वाहनतळे तात्काळ हस्तांतरीत करण्यात यावीत. पालघर जिल्हाधिकारी यांनी पालघर मधील दापचेरी, मनोर, चारोटी नाका, येथे जागेची उपलब्धता वाहनतळांसाठी करून द्यावी.ठाणे ग्रामीण भागातील शहापूर, पडघा यांचा वापर करावा. या वाहनतळाच्या ठिकाणी ट्रॅफिक वॉर्डन, फलक तसेच बॅरिकेटस लावण्यासाठी आवश्यक असेलेला निधी जिल्हा वार्षिक योजनेमधून उपलब्ध करून देण्यात येईल असेही शिंदे यांनी सांगितले. ठाणे जिल्ह्याच्या हद्दीतील गोदामांचे वेळापत्रक निश्चित करून वेगवेगळ्या दिवशी सुट्टी देण्यात यावी अशा सूचना ठाणे जिल्हाधिकारी यांना शिंदे यांनी यावेळी दिल्या. शहरांतर्गत होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ज्या ठिकाणी मेट्रो चे काम चालू आहे त्याठिकाणी अनावश्यक असलेले बॅरीकेट्स हलविण्यात यावेत. तसेच शक्य असेल त्या ठिकाणी रस्ता उपलब्ध करून द्यावा, सेवा मार्गावरील (सर्विस रोड ) अतिक्र मणे हटविण्यात यावीत, रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्यां बसेस अन्य ठिकाणी हलविण्यात याव्यात. मनपाच्या ताब्यात असलेली ११ वाहनतळे उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना यावेळी दिल्या.       पथकर मार्गावरील खड्डे प्राधान्याने भरण्याबाबत संबंधित संस्थाना चव्हाण यांनी आदेश दिले. तसेच तात्काळ खड्डे न भरल्यास पथकर बंद करू असा इशाराही त्यांनी दिला. शीळ फाटा, कळंबोली नाका, पनवेल उरण रस्ता मुंब्रा बायपास आधी ठिकाणी होणाºया वाहतूक कोंडीवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तसेच कोपरी पूल, पत्री पूल यांच्या कामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. तसेच या पुलंच्या कामाबाबत नागरिकांना माहिती देणारा फलक लावावा अशा सूचनाही संबंधित यंत्रणेला दिल्या. यांवेळी वाहतूक कोंडीवरील उपाय योजनांवर सविस्तर चर्चा झाली. अवजड वाहनांना करण्यात आलेल्या प्रवेश बंदीचे काटेकोर पालन झालेच पाहिजे असे निर्देशही त्यांनी पोलिसांना दिले.ठाणे, पालघरसह रायगड जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात खड्डेंचे साम्राज्य पसरले आहे. या खड्यांमुळे अनेकांचे बळी देखिल घेतले आहे. याची गांभीर्याने दखल घेत चव्हाण यांनी खड्यांबाबत अधिकाºयांना फैलावर घेतले. ठाणे जिल्ह्यासह पालघर व रायगड जिल्ह्यात पावसामुळे रस्त्यांवर पडलेल्या खड्यांमुळे व वाहतूक कोंडीचा फटका रु ग्णवाहीकांना देखील बसत असून रु ग्णांना देखिल प्राण गमवावे लागल्याच्या विषयांवर देखील यावेळी चर्चा झाली.ठाणे महापालिकेच्या अधिकाºयांनी पालिकाक्षेत्रातील खड्यांची माहिती यावेळी दिली. शहरात १५० किमीचे रस्ते युटीडब्ल्युटी, पेव्हरब्लॉक टाकून भारण्यात आले असल्याची माहिती अतिरीक्त आयुक्त राजेंद्र अहिरवार यांनी दिली.यावेळी चव्हाण यांनी दिव्यातील रस्ते व समस्यांकडे लक्ष देण्याच्या सुचना देखिल यावेळी अधिकाºयांना दिल्या. त्यांनी कल्याण - डोंबिवलीतील रस्त्यावरील खड्यांबाबत केडीएमसी प्रशासनाला विचारले असता, खड्यांसाठी कीती कोटींचा निधी ठेवण्यात आला असून त्यापैकी खर्च किती झाला याबाबत विचारणा केली. त्यावर खड्यांसाठी १७ कोटींचा निधी ठेवण्यात आल्याचे उघडकीस आले. पण त्यापैकी शुन्य खर्च झाला नसल्याचे यावेळी निदर्शनात आणून देण्यात आले आहे.

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी