शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

ठाणे-पालघरमध्ये ९ बळी, तीन वर्षीय बालिकेसह चौघांचा शोध सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:25 IST

मंगळवारी दिवसभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या तडाख्यामुळे ठाणे व पालघरमध्ये एकूण ९ जणांचा बळी गेल्याचे समोर आले आहे.

ठाणे : मंगळवारी दिवसभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या तडाख्यामुळे ठाणे व पालघरमध्ये एकूण ९ जणांचा बळी गेल्याचे समोर आले आहे. कळवा, मुंब्रा, वागळे इस्टेट आणि नितीन कंपनी येथील नाल्याचा परिसर अशा वेगवेगळ्या ठिकाणी बुडालेल्या चौघांचे मृतदेह सापडले असून कोरम मॉलजवळील नाल्यात बुडालेल्या एका तीन वर्षीय मुलीसह तिघांचा शोध सुरूच असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर पालघर जिल्ह्यात पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.मंगळवारी ठाणे शहरात दिवसभरात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे नाल्यांना आलेल्या पुरात कळव्यातील शांतीनगर, वागळे इस्टेटच्या रामनगर आणि जिल्हा मध्यवर्ती कारागृहाजवळील नाल्यात बुडालेल्या चौघांचे मृतदेह गेल्या २४ तासांमध्ये मिळाल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. कळव्यातील शांतीनगर भागात राहणारी रजिना शेख (३२) ही महिला मंगळवारी दुपारी मुसळधार पावसात पाण्याचा अंदाज न आल्यामुळे नाल्यात बुडाली. पोहता न आल्यामुळे तिचा बुडून मृत्यू झाला. रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांना तिचा मृतदेह मिळाला. तर येऊरच्या मामा भाचे डोंगरावर काही कामानिमित्त गेलेला शाहीद शेख (२८, रा. रामनगर) हा डोंगरावरील पाण्यात पाय निसटल्यामुळे पडला. तिथून तो वागळे इस्टेट मार्गावरील नाल्याने थेट चार ते पाच किलोमीटर लांब वाहून गेला. अग्निशमन दलाला रात्री उशिरा त्याचा मृतदेह सापडला. इतर दोघांची नावे समजू शकली नाहीत. तर आपल्या वडिलांच्या हातातून कोरम मॉल परिसरातून निसटलेल्या तीन वर्षीय गौरी या मुलीचा शोध वागळे इस्टेट पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या पथकाकडून सुरू आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत तिचा शोध लागू शकला नव्हता, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.वागळे इस्टेटमध्ये रास्ता रोकोमुसळधार पावसामध्ये अडकलेल्या कुटुंबाला वाचविण्याच्या प्रयत्नात नाल्यामध्ये वाहून गेलेल्या युवकाचा शोध घेण्यात यंत्रणा कुचराई करीत असल्याचा आरोप करून वाल्मिकी समाज आणि भारिप-बहुजन महासंघाने बुधवारी रास्ता रोको आंदोलन केले. वागळे इस्टेटमधील रामनगरात मुसळधार पावसामध्ये एक महिला आणि मुलगी घरात अडकून पडले होते.मंगळवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास त्यांना वाचविण्यासाठी नाला ओलांडून जात असताना अजय आठवाल (वय २७) वाहून गेला. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असून युवकाचा शोध घेण्यासाठी शासकीय यंत्रणा प्रयत्न करीत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला.या भागातील युवक मंगळवारपासून बेपत्ता युवकाचा नाल्यामध्ये उतरून शोध घेत आहेत. आपत्कालीन यंत्रणेतील कर्मचारी मात्र थातूरमातून पाहणी करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. वागळे इस्टेटमधील १६ नंबर सर्कलजवळ वाल्मिकी समाज आणि भारिप बहुजन महासंघाने रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर आपात्कालीन यंत्रणेच्या अधिकाºयांनी बेपत्ता युवकाचा कसून शोध घेण्याचे आश्वासन दिले.ज्ञानसाधना नाल्याजवळ राहणारे गंगाराम बालगुडे (५०) यांनी नाल्यात पडलेला ड्रम घेण्यासाठी उडी घेतली होती. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह बुधवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास नाल्यातून बाहेर काढण्यात आला. याच नाल्यात आणखी एक जण बुडाल्याची भीती व्यक्त होत असून त्याचाही शोध घेण्यात येत आहे.कोरम मॉल येथे कामाला असलेली दीपाली बनसोडे (२७) ही महिला पतीसमवेतच मॉलच्या बाहेर उभी होती. या दोघांमध्ये अवघ्या दहा फुटांचे अंतर होते. तिच्या कंबरेपेक्षा जास्त पाणी आल्यानंतर तिला पाण्याचा काहीच अंदाज न आल्यामुळे ती जवळच्याच नाल्यात पडली. यात ती वाहून गेली असून तिचाही शोध अद्याप सुरू आहे.पावसाच्या पाण्यात वाहून गेलेला ४० ते ५० वर्षीय अनोळखी मृतदेह जिल्हा मध्यवर्ती कारागृह पाण्याच्या टाकीजवळील नाल्यात बुधवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास मिळाला.ठाणे शहरातील मनोरमानगर, कोरम मॉल झोपडपट्टी, जिल्हा रुग्णालय परिसर, वागळे इस्टेट, मुंब्रा अशा वेगवेगळ्या भागांत पाण्यात आणि घरांमध्ये अडकलेल्या १०३ जणांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली.मानपाडा येथे प्रेस्टीज कंपनीची भिंत कोसळून ११ घरांचे नुकसान झाले. रेणू आणि कांचन यादव या महिला यात जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.पालघरमध्ये पाच बळीपालघर : डहाणू तालुक्यातील आंबेसरी पारसपाडा येथे नयना जाना गहला (५०) ही वृद्ध महिला शेतावरून घरी परतत असताना नाल्यामध्ये वाहून गली. जव्हार तालुक्यातील कोगदा येथील विनोद गणपत दळवी (२२) या तरुणाचा मंगळवारी सायंकाळी घरी परतत असताना नाल्यात पडून मृत्यू झाला आहे.पालघरमध्ये मुसळधार पावसादरम्यान वाघोबा खिंडीत रात्रीच्या सुमारास धबधब्याकडील वळणावर असलेल्या डोंगराची दरड रस्त्यावर कोसळली.यावेळी प्रवास करणाºया कुटुंबातील एका लहान मुलगी दरडीत सापडून मरण पावल्याची घटना घडली. तर पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तनिष्का राम बालशी (५) रा. वेवूर-पालघर, राजेश नायर, जेनिस कंपनी बोईसर यांचे मृतदेह सापडले आहेत.