शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे-पालघर जिल्ह्यांत नेत्रदात्यांची संख्या वाढतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 00:29 IST

ठाणे-पालघर या दोन जिल्ह्यांत नेत्रदात्यांची संख्या मागील अडीच वर्षांत वाढताना दिसत आहे. या अडीच वर्षांत जवळपास दोन हजार ४०० जणांनी नेत्रदान केल्याने सुमारे एक हजार ४०० जणांना दृष्टी मिळाल्याची माहिती ठाणे जिल्हा नेत्रदान विभागाने दिली.

- पंकज रोडेकरठाणे : ठाणे-पालघर या दोन जिल्ह्यांत नेत्रदात्यांची संख्या मागील अडीच वर्षांत वाढताना दिसत आहे. या अडीच वर्षांत जवळपास दोन हजार ४०० जणांनी नेत्रदान केल्याने सुमारे एक हजार ४०० जणांना दृष्टी मिळाल्याची माहिती ठाणे जिल्हा नेत्रदान विभागाने दिली. यंदा ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत ९२० टार्गेट दिले असून त्यापैकी ६३५ जणांनी नेत्रदान केल्याचे शासकीय आकडेवारीवरून दिसत आहे.दरवर्षी शासनाकडून नेत्रदानाबाबत प्रत्येक जिल्ह्याला टार्गेट दिले जाते. त्याचप्रमाणे ठाणे आणि पालघर जिल्ह्यांनाही २०१६-१७ आणि २०१७-१८ या दोन वर्षांत प्रत्येकी चारशेचे टार्गेट दिले होते. त्या टार्गेटपेक्षा ते अधिक पूर्ण केल्यानंतर २०१८-१९ या वर्षाकरिता ठाणे-पालघरला ९२० चे टार्गेट दिले गेले. त्यानुसार, एप्रिल ते आॅक्टोबरदरम्यान या दोन्ही जिल्ह्यांतून एकूण ६३५ जणांनी नेत्रदान केले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर नेत्रदान होत असताना त्यातील सर्व नेत्र उपयुक्त ठरतील, असे नाही. त्यातील उपयुक्त असलेले नेत्र हे प्रतीक्षायादीतील एक हजार ३६९ व्यक्तींना लाभल्याने त्यांना दृष्टी मिळत आहे. अशा प्रकारे ठाणे, मुंबईतील लोकांना दृष्टी मिळाल्याची माहिती संबंधित विभागाने दिली.अडीच वर्षांत दोन हजार ३७३ जणांनी नेत्रदान केले आहे. त्यामुळे १,३६९ जणांना या वर्षात दृष्टी मिळाली आहे. याबाबत राबवण्यात आलेल्या जनजागृतीचे हे फलित असल्याचे दिसते.- डॉ. पी.के. देशमुख,जिल्हा नेत्रशल्यचिकित्सक, ठाणे

टॅग्स :thaneठाणे