शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात उड्डाणपूलावरून जाणाऱ्या ट्रकमधील माल खाली कोसळला; एकाचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2020 01:24 IST

ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा; उड्डाणपूलावारील खड्डयांमुळे तीव्र नाराजी

ठाणे: वाघबीळ येथील उड्डाणपूलावरुन ठाणो ते घोडबंदर मार्गावरुन जाणारा ट्रक खड्डयात आदळला. त्यामुळे ट्रकमधील माल खालून जाणाऱ्या कारवर कोसळून कारचालक दीपक कनावजे (27) याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या अपघातामध्ये अन्य एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.वाघबीळ उड्डाणपूलावरुन 3 ऑक्टोंबर रोजी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास घोडबंदरच्या दिशेने कागदी पुठ्ठयांचा माल घेऊन हा ट्रक जात होता. हा ट्रक उड्डाणपूलाच्या निम्म्या भागापासून पुढे आला असतांना एका खड्डयात तो आदळला. त्यातच ट्रकच्या पाठीमागचा भाग बाजूला झाला. त्यामुळे ट्रकमधील पुठ्ठयाचा माल हा रस्त्यावरुन जाणा:या एका कारवर पडल्याने कारमधील पुठय़ाचे आठ ते नऊ मोठे बॉक्स खाली रस्त्यावरुन मीरा रोडकडे जाणा:या कारवर कोसळले. यात कारचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून कारचालक दीपक कनावजे (27, रा. दहिसर मोरी) आणि प्रशांत देवरकोंडा (38, रा.मीरा रोड, ठाणो) हे दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांनाही जवळच्याच एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच दीपकचा मृत्यु झाला. दीपक हा दहिसर मोरी येथील कृष्णागिरी इम्पॅक्ट या कंपनीमध्ये व्यवस्थापक म्हणन नोकरीला होता. हयगयीने ट्रक चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला ताब्यात घेतल्याचे सहायक पोलीस निरीक्षक सहादेव पालवे यांनी सांगितले.अपघातानंतर घटनास्थळी मोठया प्रमाणात ‘बघ्यां’ची गर्दी उसळली होती. यात अनेकजण अपघाताचे छायाचित्र मोबाइलमध्ये टिपण्यात गुंतले होते. त्यामुळे कासारवडवली पोलीस आणि वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांना वाहतूक कोंडी सोडवितांना मोठया अडचणी निर्माण झाल्या होत्या. या मार्गावरील वाहतूक ही सेवा रस्त्याने वळविण्यात आली. त्यामुळे रात्री 12 नंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती सूत्रंनी दिली.