शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Thane: डिजी ठाणे उपक्रमाच्या स्वारस्य अभिव्यक्ती निविदेला प्रतिसाद नाही, पालिकेने दिली मुदतावाढ

By अजित मांडके | Updated: August 11, 2022 17:50 IST

Thane: ठाणे महापालिकेच्या माध्यमातून स्मार्ट सिटी अंतर्गत डिजी ठाणे हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला होता. मात्र मागील नऊ महिन्यापासून हा प्रकल्प बंद आहे.

- अजित मांडके ठाणे - ठाणे महापालिकेच्या माध्यमातून स्मार्ट सिटी अंतर्गत डिजी ठाणे हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला होता. मात्र मागील नऊ महिन्यापासून हा प्रकल्प बंद आहे. त्यामुळे आधीच्या ठेकेदाराला मुदतवाढ न देता आणि पुढील १० वर्षासाठी पालिकेच्या तिजोरीवर भार न देता, हा प्रकल्प इतर संस्थेकडून राबविण्यासाठी महापालिकेने हालचाली सुरु केल्या आहेत. त्यानुसार पालिकेच्या तिजोरीवर कोणत्याही स्वरुपाचा भार न देता इतर संस्थेकडून अभिव्यक्ती निविदा मागविण्यात आली. त्यानुसार याला केवळ एकाच ठेकेदाराने तयारी दर्शविली असल्याने पालिकेने त्या निविदेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मुदतवाढ देऊनही ठेकेदार मिळणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

ऑगस्ट २०१७ रोजी डिजी ठाण्याला वर्क ऑर्डर देण्यात येऊन तीन वर्षासाठी संबधीत ठेकेदाराला ३२ कोटी दिले जाणार होते. त्यानुसार डिजी ठाण्याच्या माध्यमातून ठाणोकरांना मालमत्ता कर भरल्यास सुट मिळणार हे दिसून आले. तर यात व्यापा:यांना देखील सहभागी करुन घेतले होते. त्यानुसार यात २.८० लाख ठाणोकरांना याचे अॅप डाऊनलोड केले होते. परंतु त्याचा वापर किती जणांनी केला याची माहिती पुढे आलेली नाही. तर यामध्ये सुमारे ५५० व्यापा:यांनी यात सहभाग घेतला होता. सुरवीताला काही योजनांचा फायदा व्यापा-यांनी दिला.

दरम्यान त्या अनुषंगाने संबधीत एजेन्सीला सुरवातीला ११ कोटींचे बिले अदा करण्यात आले. त्यानंतर दुसरे बिल ६.३० कोटींचे मंजुरीसाठी आणण्यात आले. परंतु त्याचवेळेस या योजनेचा लाभ किती जणांनी घेतला, व्यापा:यांचा किती सहभाग होता, किती ठाणोकरांना व्यापा:याकडील योजनांचा फायदा झाला, अशा काही शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. याच कारणामुळे महापालिकेच्या संबधींत अधिका-याने या बिलावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला होता. परंतु तरी देखील दबावापोटी डिजी ठाण्याचे जवळ जवळ ३१ कोटींचे बील अदा करण्यात आले असून अवघे १.२५ कोटींचे बिल देणे शिल्लक असून ते बील थांबविण्याचे आदेश तत्कालीन महापौर नरेश म्हस्के यांनी दिले होते. दुसरीकडे या संस्थेचा कालावधी संपल्याने मागील नऊ महिन्यापासून हा वादग्रस्त प्रकल्प बंद आहे.

दरम्यान, आता यापुढे असा प्रकार होऊ नये म्हणून उशिराने का होईना पालिकेला सुबुध्दी सुचली असून त्यांनी आता डिजी ठाणो हा प्रकल्प सुरु करण्यासाठी आता नव्याने हालचाली सुरु केल्या आहेत. त्यानुसार हा प्रकल्प पुढील १० वर्षासाठी चालविला जाणार असून त्यासाठी पालिका एक रुपयाचा देखील खर्च करणार नाही. हा खर्च संबधींत संस्थेला करावा लागणार आहे. त्यानुसार याची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. २२ जुलै रोजी ही निविदा काढण्यात आली असून त्याला अद्यापही प्रतिसाद मिळालेला नाही. केवळ एकाच ठेकेदाराने प्रतिसाद दिल्याने पालिकेने पुन्हा या निविदेस २३ ऑगस्ट २०२२ र्पयत मुदतवाढ दिली आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका