शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

Thane: ठाण्यातून पाकिस्तानला गेलेल्या नगमाची पोलिस कोठडीत रवानगी

By अजित मांडके | Updated: July 25, 2024 21:40 IST

Thane News: बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट तयार करून पाकिस्तानला गेलेल्या नगमा खान हिला वर्तक  नगर पोलिसांनी गुरुवारी दुपारी अटक केली. तिला २७ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

- अजित मांडके ठाणे - बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट तयार करून पाकिस्तानला गेलेल्या नगमा खान हिला वर्तक  नगर पोलिसांनी गुरुवारी दुपारी अटक केली. तिला २७ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. खानने पाकिस्तानात जाऊन गुपचूप निकाह (लग्न) करून ती पुन्हा ठाण्यात परतली होती. पोलिसांनी तिला २५ जुलै रोजी अटक केल्यानंतर  ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. तेंव्हा तिला दोन दिवस पोलिस कोठडी  देण्यात आली.

ठाण्यातील नगमा नूर मकसूद अली ऊर्फ सनम खान या २३ वर्षांच्या तरुणीने सोशल मीडियावर ओळख झालेल्या पाकिस्तानी तरुणाशी पाकिस्तानात जाऊन गुपचूप निकाह (लग्न) केला होता. तिथून  ती पुन्हा ठाण्यात परतली  होती. तिने  बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट बनवल्याप्रकरणी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला  आहे.  याप्रकरणी  वर्तकनगर पोलिसांनी गुरुवारी दुपारी  तिच्या राहत्या घरून तिला अटक केली.

यानंतर तिला ठाणे सत्र न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने तिला शनिवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलीस उपायुक्त अमरसिहं जाधव यांनी दिली.  नगमा हेरगिरी करण्यासाठी भारतात परत आल्याचा संशय गुप्तचर यंत्रणेसह वर्तकनगर पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान, तिने नावात बदल करून बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच तिच्या मुलीचा बनावट जन्म दाखला आणि आधार कार्ड ठाण्याच्या लोकमान्यनगर बस डेपोजवळील एका दुकानातील व्यक्तीकडून तयार केले. हीच कागदपत्रे आधार कार्डसोबत जोडून पारपत्र कार्यालयात तसेच वर्तकनगर पोलिस ठाण्यात दाखल केले. ही कागदपत्रे खरे असल्याचे भासवून त्याद्वारे पासपोर्ट मिळवला. त्याआधारे पाकिस्तानचा व्हिसा प्राप्त करून ती २ मे २०२३ ते १५ मे २०२४ या दरम्यान पाकिस्तानमध्ये गेली. त्यामुळे तिच्याविरुद्ध वर्तकनगर पोलिस ठाण्यात १९ जुलै २०२४ रोजी फसवणुकीसह भारतीय पासपोर्ट कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी