शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिकेच्या २४० घंटागाडी कामगारांचे काम बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 14:42 IST

ठाणे महापालिकेच्या घंटागाडी कामगारांनी गुरुवारी सकाळ पासून विविध मांगण्यासाठी काम बंद आंदोलनाची हाक दिली आहे. त्यामुळे शहरातील वर्तकनगर, वागळे आणि माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत एकही गाडी फिरकू शकलेली नाही.

ठळक मुद्देठेकेदाराकडून अरेरावी, कामगारांचा आरोप२४० घंटागाडी कामगार काम बंद आंदोलनात सहभागी

ठाणे - विविध प्रकारची थकबाकी, पुढील तीन वर्षाच्या कपड्यांचे आधीच पैसे कापणे, तीन महिन्यापासून सुरु असलेली पगारात यासह विविध मागण्यांसाठी आणि ठेकेदाराच्या अरेरावीच्या विरोधात २४० घंटागाडी कामगारांनी गुरुवारी सकाळ पासून अचानकपणे काम बंद आंदोलन केले. जो पर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तो पर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा इशारा या कामगारांनी दिला आहे.           गुरुवारी सकाळी वर्तक नगर, वागळे आणि माजिवडा मानपाडा प्रभाग समितीत एकही घंटा गाडी फिरकली नाही. त्यामुळे या भागातील नागरीकांना घंटा गाडी न येण्याचा मुद्दाच समजू शकला नाही. प्रत्यक्षात या भागात फिरणाºया २४० घटांगाडीवरील कामगारांनी गुरवारी सकाळ पासूनच अचानक काम बंद आंदोलन पुकारले आहे. ठेकेदार एम. कुमार याच्या अरेरावीचा विरोध करीत या कामगारांनी गुरुवारी एकही गाडी बाहेर काढली नाही. या कामागारांच्या म्हणन्यानुसार २०१८-१९ आणि २० या तीन वर्षाचे ठेकेदाराने कपड्यांचे पैसे आधीच कापूण घेतले आहे. नियमानुसार ते चुकीचे असून या तीन वर्षाचे कपडे देखील त्याने आगाऊ घ्यावेत अशी नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे तीन वर्षाचे पैसे कापूनही हाती पडलेले कपडे केवळ आठ दिवसातच खराब झाले असून त्यांचा दर्जा देखील खालचा आहे. त्यातही तीन वर्षाचे पैसे कापले हे जरी मान्य केले तरी देखील २०१७ मधील देखील पैसे आता का कापले असा सवाल या कामगारांनी उपस्थित केला आहे. मागील कित्येक वर्षापासूनची थकबाकी अद्यापही देण्यात आलेली नाही, पगार तारखेला होत नाहीत, कमी पगार दिला जातो, काही कामगार कामावर असून सुध्दा त्यांना कामावर नसल्याचे सांगून त्यांना पगारापासून वंचित ठेवले जात आहे. मागील तीन महिन्यापासून ७ हजार २०० रुपये पगारातून कापले जात आहेत, ते कशासाठी कापले जात आहेत, याचे उत्तर देखील मिळत नाही. याबाबत ठेकेदाराकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवा उडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप या कामगारांनी केला आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाStrikeसंप