शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिकेच्या शाळांमध्ये ८० टक्के मुख्याध्यापकांची कमतरता, बीएलओच्या कामांमुळे शिक्षक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 12:34 IST

ठाणे महापालिकेच्या शाळांमध्ये ८० टक्के मुख्याध्यापकांची कमतरता असल्याची बाब समोर आली आहे. तसेच अनेक शिक्षकांना बीएलओचे काम लावण्यात आल्याने शिक्षक हैराण झाले आहेत.

ठळक मुद्देआजारी शिक्षकांनाही बीएलओचे कामअन्यथा न्यायालयात जाण्याचा शिक्षकांचा इशारा

ठाणे - एकीकडे २०१७-१८ च्या शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पात शिक्षण विभागाने शाळांचा दर्जा उचांवण्याबरोबरच विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्याचा दावा केला आहे. अत्याधुनिक शिक्षण पध्दती अंगीकारण्यासाठी देखील पालिकेचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु असे असतांनाही तब्बल ८० टक्के शाळांमध्ये मुख्याध्यापकच नसल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. त्यातही आता अनेक शिक्षकांना पुन्हा बीएलओच्या कामाला जुंपविण्यात आल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे.             ठाणे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी पालिकेने विविध स्वरुपाच्या योजना हाती घेतल्या आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षण विभागाने, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देतांनाच, इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु करणे, ई लर्निंग आदींसह विविध योजना हाती घेण्यात आल्या आहेत. परंतु असे असले तरी मागील पाच वर्षापासून महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेले मुख्याध्यापकच नसल्याने, विद्यार्थ्यांचे भवितव्य काहीसे अंधातरी आल्याचे दिसत आहे. या संदर्भात काही शिक्षक संघटनांना पालिकेकडे पत्रव्यवहार केल्यानंतर जुन्या शिक्षकांच्या हाती सेवा जेष्ठता लक्षात घेऊन काही शाळांमध्ये त्यांनी मुख्याध्यापक पदाची सुत्रे हाती देण्यात आली. परंतु ती केवळ नावापुरतीच असल्याचे दिसत आहेत. त्यांना तसे कोणतेही अधिकार देण्यात आले नसल्याचा सांगण्यात येत आहे. आता तर ८० टक्के शाळांमध्ये मुख्याध्यापक नसल्याची बाब समोर येत आहे. एका शाळेत ७ शिक्षक असतात ७ पैकी ५-६ शिक्षकांना बीएलो चे आदेश देण्यात आले आहेत. शाळा क्र .९५ काजुवाडी ,शाळा क्र. १७ कोपरी येथे मुख्याघ्यापक सह सर्व शिक्षकांना आदेश देण्यात आल्याचे शिक्षक संघटनांचा दावा आहे. तसेच एका शिक्षिकेला डोळ्याचा आजार आहे. काहींना गुडघ्यांचे आजार आहेत आशा शिक्षकांना देखील अशा कामांना लावण्यात आले आहे. त्यामुळे किमान अशा शिक्षकांना तरी वगळण्यात यावेत अशी मागणी, शिक्षण संघटनेने शिक्षण विभागाकडे केली आहे. प्रशासनाने खाजगी शाळेसह इतर विभागातील कर्मचाºयांना आदेश काढावेत व एका शाळेत किमान एकाच शिक्षकाला बीएल ओचे आदेश दयावेत, अन्यथा आम्हाला ही इतर शिक्षकांना प्रमाणे कोर्टात जावे लागेल असा इशाराच आता या शिक्षकांनी दिला आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त