शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे पालिकेच्या सत्तेत हवी ‘चौकीदारा’ला भागीदारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 02:26 IST

भाजपचे शिवसेनेला साकडे : पालकमंत्र्यांनी दिला सबुरीचा सल्ला

ठाणे : ठाणे महापालिकेत चौकीदाराची चोख भूमिका बजावणाऱ्या भाजपने युती झाल्यानंतर आता पालिकेच्या सत्तेत भागीदारी मागितली आहे. सोमवारी झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात भाजपचे शहर अध्यक्ष संदीप लेले यांनी शिवसेनेकडे ही गुगली टाकून चौकीदाराची भूमिका स्पष्ट केली. त्यावर शिवसेनेचे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील युती झाली असल्याने टप्प्याटप्प्याने सर्व काही सुरळीत होईल, असे सांगून चौकीदाराच्या सत्तेत येण्याचा मार्ग एकप्रकारे प्रशस्त केल्याचे बोलले जात आहे.

सोमवारी सायंकाळी उशिरा शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजपचे शहर अध्यक्ष लेले यांनी आपल्या भाषणातून महापालिकेच्या सत्तेत वाटा मागितला. तुम्हाला आम्ही साथ देऊ, तुम्ही खासदार, आमदारही आमच्यामुळे व्हाल. परंतु त्याबदल्यात आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वाटा द्यावा, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली. एकूणच भाजपने यापूर्वी झालेल्या शिवसेनेबरोबरच्या गुप्त बैठकीत ठाणे महापालिकेत एक वर्षासाठी स्थायी समिती आणि उपमहापौर पद मागितले होते. तसेच अडचणीत असलेल्या दोन नगरसेवकांवरील टांगती तलवार दूर करण्याचा हट्टसुध्दा धरला होता. परंतु त्यानंतर त्यावर काहीच होत नसल्याने २३ नगरसेवक नाराज झाले होते. दरम्यान, वरिष्ठांकडून तंबी मिळाल्यानंतर या नाराज नगरसेवकांनी आपली तलावार म्यान केली. असे असले तरी त्यांनी आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी सोमवारी थेट व्यासपीठाचाच आधार घेतला.

यापूर्वी पालिकेत चौकीदाराच्या भूमिकेत असलेल्या भाजपने शिवसेनेच्या विरोधात अनेकवेळा आवाज उठविला. थीम पार्क असो, बॉलीवूड पार्क, खाडीचे पाणी शुध्द करणे असो किंवा पोलिसांना देण्यात येणाऱ्या दुचाकी अशा अनेक विषयांवरुन सेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत कैचीत धरले होते. असे असताना आता त्याच भ्रष्टाचारी शिवसेनेबरोबर लेलेंना सत्तेत भागीदारी हवी असल्याने एक प्रकारे भ्रष्टाचारात आम्हालाही सहभागी करुन घ्या असे तर त्यांना म्हणायचे नसेल ना, असा सवाल उपस्थित होत आहे.असहकाराची भूमिका सत्तेसाठीच का?च्कदाचित नगरसेवकांनी पुकारलेला असहकार हासुध्दा सत्तेत येण्यासाठीच होता का, असेही चित्र आता लेले यांच्या वक्तव्यानंतर निर्माण झाले आहे. गेले काही दिवस यावरून राजकारण तापले होते.च्शिवसेनेचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या चौकीदाराला सबुरीचा सल्ला देत सर्वांना समान संधी दिली जाईल अशा शब्दात आश्वस्त केले आहे. त्यामुळे निवडणूक आटोपताच या मुद्यावर वाद रंगण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणेShiv Senaशिवसेना