शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिका हद्दीत स्वच्छ प्रभाग स्पर्धेची लगबग सुरु, पहिले बक्षीस ५० लाखांचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 16:14 IST

ठाणे महापालिका हद्दीत आता येत्या दोन ते तीन दिवसात स्वच्छ प्रभाग स्पर्धा सुरु होणार आहे. यासाठी ठाणे महापालिकेने त्रयस्त समितीची नेमणूक केली आहे. जो या स्पर्धेत बाजी मारेल त्याला पहिले बक्षीस ५० लाखांचे दीले जाणार आहे.

ठळक मुद्देप्रत्येक स्वच्छतेसाठी दिले जाणार गुणस्पर्धेचा अहवाल शासनाकडे पाठविला जाणार

ठाणे - राज्य शासनाने जारी केलेल्या एका आध्यादेशानुसार ठाणे महापालिकेने आता स्वच्छ प्रभाग स्पर्धा राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, जो प्रभाग या स्पर्धेत बाजी मारेल त्याला ५० लाखांचे पहिले बक्षीस दिले जाणार आहे. यासाठी पालिकेच्या घनकचरा विभागाने एक त्रयस्त समिती नेमली असून या समितीच्या माध्यमातून ही स्पर्धा घेतली जाणार आहे. यासाठी नगरसेवकांना देखील जागरुक केले जाणार आहे.                 केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियनाच्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी सुरु आहे. या अभियानाअंतर्गत राज्यातील प्रत्येक शहरात कचरा लाख मोलाचा या अंतर्गत निर्मितीच्या जागी कचऱ्याचे वर्गीकरण (ओला व सुका) करुन या वर्गीकरणाकृत केलेल्या कचऱ्यावर केंद्रीत अथवा विकेंद्रीत पध्दतीने प्रक्रिया करण्याबाबत सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना सुचना देण्यात आल्या असून त्यानुसार आता त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. यामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांअतर्गत स्पर्धा घेण्यास सुरवात झाली आहे. त्यानुसार उशिराने का होईना ठाणे महापालिकेने देखील या स्पर्धेत भाग घेतला आहे. ही स्पर्धा प्रत्येक प्रभागात घेतली जाणार आहे. स्वच्छ प्रभाग ठेवणे, घरोगरी जाऊन कचरा संकलन पध्दत अवलंबिणाऱ्या घरांचे प्रमाण, १०० घरातून संकलनाची टक्केवारी यासाठी १०० गुण, एकूण निर्माण होणाऱ्या कचऱ्यापैकी किती टक्के कचऱ्याचे ओला व सुका कचरा या स्वरुपात वर्गीकरण केले जाते यासाठी ४०० गुण, वार्डमध्येच ओल्या कचऱ्यावर विकेंद्रीत पध्दतीने प्रक्रिया केली जाते, यासाठी १००, वार्डातील नेहमी कचरा दिसणाऱ्या ठिकाणांचे सुशोभिकरण यासाठी ५०, वार्डमधील सर्व घरांमध्ये १०० टक्के वैयक्ति शौचालयांचे प्रमाण १००, वैयक्तीक सामुदायिक शौचालयांचे प्रमाण ५० टक्के, नगरसेवकांनी स्वच्छ सर्व्हेक्षण २०१८ विषयी जनजागृतीचे कार्यक्रम घेतले आहेत यासाठी ४०० गुण, वार्डात १०० टक्के मालमता कर संकलन करण्यात आलेले आहे का? यासाठी ५० गुण, वॉर्डात प्लास्टीक बंद करण्यात आली असून राबविण्यात येत आहे ५० गुण आदींच्या स्वरुपात मार्कस दिले जाणार आहेत.           त्यानुसार आता येत्या दोन ते तीन दिवसात ही स्पर्धा त्रयस्त समितीच्या माध्यमातून सुरु होणार आहे. नगरसेवकांना देखील या विषयीची माहिती दिली जाणार आहे. ज्या वॉर्डांना या स्पर्धेत अधिक गुण मिळतील त्यांची प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी निवड केली जाणार आहे. यामध्ये प्रथम क्रमांकासाठी ५० लाख, द्वितीयसाठी ३५ आणि तृतीय क्रमांकासाठी २० लाखांचे बक्षीस दिले जाणार आहे. परंतु यातून ज्या प्रभागांचे क्रमांक लागणार आहेत. त्यांचा अहवाल हा शासनाकडे पाठविला जाणार आहे. शासनाकडून पुन्हा याची माहिती घेतली जाणार असून त्यानंतरच निकाल दिला जाणार आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त