शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना हवाय २५ हजार सानुग्रह अनुदान

By अजित मांडके | Updated: October 3, 2022 19:11 IST

ठाणे महापालिकेचे ८ हजार २७८ कायस्वरूपी  कर्मचारी असून कंत्नाटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांची संख्या अडीज हजारांच्या घरात आहे.

ठाणे- मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान जाहीर झाले आहे. मात्र ठाणे महापालिकेने अद्यापही कर्मचाऱ्यांना ते जाहीर केलेले नाही. ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना २५ हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे अशी मागणी म्युनिसिपल लेबर युनियनने ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे. सोमवारी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेतली. या भेटीत कंत्रटी कामगारांना देखील एक महिन्याचे वेतन हे सानुग्रह अनुदान म्हणून द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

ठाणे महापालिकेचे ८ हजार २७८ कायस्वरूपी  कर्मचारी असून कंत्नाटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांची संख्या अडीज हजारांच्या घरात आहे. त्यामुळे दिवाळीच्या आधीच सानुग्रह अनुदान द्यावे अशी मागणी युनियनने केली आहे.

मागील वर्षी पालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार ५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. यंदा ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली झाली असल्याने कर्मचाऱ्यांना २५ हजार सानुग्रह अनुदान द्यावे अशी मागणी युनियनचे अध्यक्ष रवी राव यांनी केली आहे. तसेच पुढील तीन वर्षासाठी सानुग्रह अनुदानात प्रत्येकी २५ टक्के वाढ करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे. याशिवाय महापालिकेच्या सेवेत विविध विभागात कंत्रटी स्वरुपात कामगार काम करीत आहेत. त्यांना देखील सानुग्रह अनुदान म्हणून एक महिन्यांचे वेतन द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारली असली तरी देखील महापालिकेवर आता कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाचा भार पडला आहे. त्यातही पालिकेचा आस्थापनेवरील खर्च हा सध्या ४२ टक्यांवर आहे, जो ३५ टक्यांच्या आत असणो अपेक्षित आहे. त्यामुळे या सर्वाचा विचार करुन पालिका सानुग्रह अनुदान जाहीर करणार असल्याचेच बोलले जात आहे. मात्र मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणोच ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली जाईल असा विश्वास महापालिकेने व्यक्त केला आहे. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणेDiwaliदिवाळी 2021