शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिकेचा सार्वजनिक गणेशोत्सव यंदा दीड दिवसांचा : नरेश म्हस्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 17:56 IST

सोशल डिस्टन्सिंग आणि शासनाने व महापालिकेने ठरविलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून हा गणेशोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी शुक्रवारी झालेल्या बैठकीत जाहीर केले.

ठाणे : यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोना संकटाचे सावट आहे, परंतु गणेशोत्सवाची पंरपरा खंडीत होऊ नये, यासाठी ठाणे महानगरपालिकेचा सार्वजनिक गणेशोत्सव यंदा दीड दिवस साजरा करण्यात येणार आहे. सोशल डिस्टन्सिंग आणि शासनाने व महापालिकेने ठरविलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून हा गणेशोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी शुक्रवारी झालेल्या बैठकीत जाहीर केले.ठाणे महानगरपालिका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे 38 वे वर्ष आहे. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे हा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याबाबत आज महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीस उपमहापौर पल्लवी कदम, माजी महापौर मिनाक्षी शिंदे, उपआयुक्त तथा गणेशोत्सव मंडळाचे उपाध्यक्ष अशोक बुरपल्ले, प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान, उपनगर अभियंता विनोद गुप्ता, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष कदम, सुरक्षा अधिकारी मच्छिंद्र थोरवे, मंडळाचे कार्यवाह आर. के. पाटील, सचिव, पी. एच.पाटील, खजिनदार संजय माने आदी उपस्थित होते.ठाणे महापालिका मुख्यालयातील पहिल्या मजल्यावरील जागेत श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. यंदाचा गणेशोत्सव हा दीड दिवस साजरा करून श्रींच्या मूर्तीचे विसर्जन महापालिकेच्या प्रांगणात कृत्रिमरीत्या केलेल्या व्यवस्थेमध्ये करण्यात येणार आहे. तसेच यावर्षी कोणत्याही प्रकारची देणगी स्वीकारली जाणार नसून अत्यंत साधेपणाने हा उत्सव करण्यात येईल, असे महापौर नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले. ठाणेकरांनी सुद्धा यंदाचा गणेशोत्सव महापालिकेने आखून दिलेल्या सूचनांचे पालन करून साजरा करावा तसेच गणेशमूर्तीचे विसर्जन घरातच करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन देखील महापौरांनी केले आहे.