ठाणे महापालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. पाणी गळतीच्या दुरुस्तीसाठी शहरातील अनेक भागात २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. पण, ३६ तास उलटून गेले तरी पाणीपुरवठा सुरू झालेला नसल्याने घोडबंदर रोड भागात नागरिकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागते आहे. टँकरची उपलब्धता नसल्याने नागरिकांना पर्यायी सोय देखील नाही. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतील माजिवडा जंक्शन येथे मुख्य जलवाहिनीमधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे, परिणामी वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून सदरची गळती तातडीने बंद करणे आवश्यक आहे. या कामासाठी शनिवार दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.०० ते रविवार दिनांक १२ एप्रिल २०२६ सकाळी ९.०० वाजेपर्यत एकूण २४ तास ठाणे शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे, असे महापालिकेने कळवले होते.
रविवारी सकाळी नऊ वाजेनंतर पाणीपुरवठा सुरळीत होण्याची अपेक्षा होती, पण रात्रीपर्यंत महापालिकेतर्फे पाणीपुरवठा झालेला नाही. या शटडाऊन कालावधीत ठाणे महापालिकेअंतर्गत दत्तवाडी, बॉम्बे कॉलनी, जीवन बाग, मुंब्रा देवी, शैलेश नगर, उदय नगर, रेतीबंदर, सम्राट नगर, नारायण नगर, मेक कंपनी जलकुंभ ते शंकर मंदिर, संजय नगर परिसर, रघुकुल, पारसिक नगर, आतकोनेश्वर नगर परिसर, पौंड पाडा, आतकोनेश्वर, खारेगाव, कळवा, मनिषानगर, क्रांतीनगर, साकेत कॉम्प्लेक्स, महागिरी, खारटन रोड, सिडको बसस्टॉप परिसर, कोपरी कोळीवाडा,पंचगंगा, राबोडी १ व २, आकाशगंगा, बाळकुम, राम मारुती नगर, लोढा अमारा, कल्पतरु, ब्रह्मांड, रुतु सिटी, गोकुळनगर, आझादनगर, मसनवाडा, रुतु पार्क परिसर, लोकमान्य नगर, इंदिरानगर, सावरकर नगर, साठेनगर, आंबेवाडी, डवलेनगर, रामनगर, कैलासनगर, जुना गांव, किसननगर, भटवाडी, श्रीनगर, शांतीनगर, रुपादेवी पाडा, ज्ञानेश्वरनगर परिसर, किसननगर नं. ३ परिसर, काकडे चाळ, कांदबरी सोसायटी, लोकदर्शन सोसायटी, परेरा नगर, सुदर्शन कॉलनी परिसर, आझाद नगर, गोकुळ नगर, जेलटाकी परिसर, पोलीस लाईन, खारकार आळी, जरीमरी, वृंदावन, श्रीरंग, विकास कॉम्प्लेक्स, आंबेडकर नगर, गांधी नगर, सुभाष नगर, नळपाडा, वसंतविहार, लोकपुरम, लोक उपवन, देवदयानगर परिसर, कोकणी पाडा, वराडवाडी, शिवाई नगर, गावंड बाग, नीळकंठ, शास्त्रीनगर नं. १ व २, लक्ष्मीबाग, विहंगपार्क, मैत्री पार्क, सिध्दांचल कॉम्प्लेक्स, वसंत विहार म्हाडा, वसंतविहार, माजिवडा, मानपाडा, कोठारी कंपाऊंड, ढोकाळी, मनोरमा नगर, रुनवाल, डोंगरपाडा, विजयनगर, विजयपार्क, वाघबीळ, आनंदनगर, कासारवडवली, वर्तक नगर परिसर, चिराग नगर, लोकमान्य नगर पाडा नं. १, दोस्ती कॉम्प्लेक्स, वेदांत कॉम्प्लेक्स, कोरस नक्षत्र, रूनवाल कॉम्प्लेक्स परिसर, लोकमान्य नगर पाडा नं. २, शास्त्रीनगर नं. २, आर्य क्रिडा मंडळ, क्रोम पार्क, मोरेवाडी, समतानगर, वर्तकनगर, भीमनगर परिसर, ज्ञानेश्वर नगर, महात्मा फुलेनगर, गंगाधर नगर, वैतीवाडी, सिध्देश्वर, चंदनवाडी, पाटीलवाडी, चरई, मावळीमंडळ, कोलबाड, गोकुळनगर, आझादनगर, खोपट, सिव्हील हॉस्पिटल परिसर, आंबेडकर रोड परिसर, मनोरुग्णालय परिसर, शिवाजीनगर, रघुनाथनगर, डिसोझावाडी, कशीश पार्क, रहेजा गार्डन, ग्रीष्मा सोसायटी, धर्मवीर नगर, परबवाडी, इटर्निटी कॉम्प्लेक्स, विष्णुनगर, भास्कर कॉलनी, ब्राह्मण सोसायटी, घंटाळी, राम मारुती रोड, साठेवाडी, वागळे एमआयडीसी परिसर, केणीनगर, नेहरुनगर, किसननगर नं. २ इत्यादी भागांचा पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद करण्यात आला होता.
पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, सदर कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरण्याचा आवाहन महापालिकेने केलं होतं, पण अद्याप पाणीपुरवठा सुरू झालेला नाही.
Web Summary : Thane's water shutdown, initially for 24 hours, stretched to 36, leaving residents without water. A major pipeline leak exacerbated the problem, causing widespread inconvenience and a lack of tanker support amid summer heat. Areas are still awaiting resumed water supply.
Web Summary : ठाणे में पानी की कटौती, जो शुरू में 24 घंटे के लिए थी, 36 घंटे तक खिंच गई, जिससे निवासी पानी के बिना रहे। एक प्रमुख पाइपलाइन रिसाव ने समस्या को बढ़ा दिया, जिससे व्यापक असुविधा हुई और गर्मी के बीच टैंकर समर्थन की कमी हो गई। क्षेत्रों को अभी भी पानी की आपूर्ति फिर से शुरू होने का इंतजार है।