शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

ठाणे महापालिकेच्या वृक्षवल्ली २०१८ प्रदर्शनाला सुरवात, ५०० जातींचे वृक्ष पाहण्याची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 16:38 IST

ठाणे महापालिकेच्या वृक्षवल्ली २०१८ या प्रदर्शनास शुक्रवार पासून सुरवात झाली आहे. येत्या १४ जानेवारी पर्यंत सुरु राहणार असून, यामध्ये ४० स्टॉल आहेत. तर ५०० जातीचे वृक्ष पाहण्याची संधी मिळणार आहे.

ठळक मुद्दे५०० जातींचे वृक्ष आले एकाच छताखालीवृक्ष लागवड वाढविणे हाच मुख्य उद्देश

ठाणे - केवळ इंटरनेटवर अथवा सोशल मीडियावर फुलांचे, झाडांचे किंवा पर्यावरणाचे फोटो पाहून सध्याचे युवक समाधान मानत आहेत. परंतु खरी फुले, वेगवेगळी झाडे पाहण्याची संधी त्यांना मिळाली आहे ठाण्यात वृक्षवल्ली नावाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने. ठाणे महापालिकेच्या या प्रदर्शनात ५०० हुन अधिक वेगवेगळ्या जातीची फुले व झाडे, वेली असून ती पाहण्यासाठी ठाणेकरांनी मोठी गर्दी केली आहे.              जास्तीत जास्त ठाणे हिरवे व्हावे, ठाण्यात झाडांची संख्या वाढावी व ठाण्यातील प्रदूषण कमी व्हावे या दृष्टीने हे प्रदर्शन महापालिकेमार्फत भरविले जाते. त्यानुसार यंदाचेही हे १० वे वर्ष आहे. वृक्षवल्ली २०१८ या प्रदर्शनाचे उदघाटन शुक्रवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यसह जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या समवेत अनेक मान्यवर उपस्थित होते. पालिकेच्या वतीने भरविण्यात आलेले हे प्रदर्शन ठाणेकर नागरिकांसाठी १४ जानेवारी पर्यंत खुले राहणार आहे. झाडांचे जतन व्हावे तसेच नवीन झाडांची लागवड मोठ्या प्रमाणात व्हावी या करिता या प्रदर्शनचे आयोजन रेमंड कंपनीच्या प्रांगणात करण्यात आले आहे. या प्रदर्शनात शोभिवंत पानफुलांच्या कुंड्यांबरोबर, वामन वृक्ष, कॅक्टस, आॅर्किड गुलाब पुष्प, पुष्प रचना, गुलाब, झेंडू, अनेक रानटी फुले, औषधी वनस्पती, कमळ, वेगवेगळ्या रंगाचा मोगरा, जाई जुई, जास्वंद, आर्चिड, रान मोगरा, गावठी झेंडू अशा अनेक प्रकारची फुले येथे उपलब्ध आहेत, फळ झाडांची मांडणी, भाजीपाला उद्यानाची प्रतिकृती, निसर्ग आणि पर्यावरणावर आधारित छायाचित्र, रंगचित्रणाचा देखील या मध्ये समावेश आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांना आवडती शोभिवंत झाडे, फुलांची रोप, कुंड्या, हंगामी फुलांची रोप, औषधाची वनस्पतीची माहिती मिळणार आहे. किबंहुना या सर्व पर्यावरणाची माहिती या समाजातील सर्वच वर्गाला या माध्यमातून मिळणार आहे. ठाण्यात झाडांची संख्या वाढून ठाण्यातील प्रदुर्षण कमी होणार आहे. हाच प्रदर्शनच मुख्य उद्देश आहे आणि दुसरा उद्देश म्हणजे तरु ण वर्गाला या पर्यावरणाची ओळख पटवून देणे यासाठी हे प्रदर्शन भरविण्यात आल्याचे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सांगितले.या प्रदर्शनात विविध प्रकारच्या नर्सरी,औषध आणि कुंड्या आदींचे ४० स्टॉल धारक यांचा समावेश असून या प्रदर्शनात ५०० हुन अधिक झाडे पाहण्याची संधी मिळाली आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त