शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिका परत करणार विद्यार्थ्यांची बेकायदेशीर फी, प्रस्ताव महासभेच्या पटलावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 14:35 IST

तब्बल १४ वर्षे बेकायदेशीर इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनाकडून वसुल करण्यात आलेली फी आता महापालिका परत करणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे.

ठळक मुद्देसुमारे ६०० विद्यार्थ्यांना होणार फायदासव्वा कोटींच्या आस फी परत केली जाणार

ठाणे - मागील १४ वर्षे ठाणे महापालिकेच्या इंग्रजी शाळांमधून बेकायदा वसुल केलेली फी अखेर विद्यार्थ्यांना परत देण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. यासंदर्भातील महत्वाचा प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे तब्बल सव्वा कोटींची रक्कम सुमारे ६०० विद्यार्थ्यांना परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. समान शिक्षण मूलभूत अधिकार समितीने मात्र वसूल करण्यात आलेली फी आणि प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक साहित्यासाठी झालेला पालकांचा खर्च अशी मिळून ही रक्कम जवळपास २ कोटींपेक्षा अधिक असल्याचा दावा समितीच्या वतीने करण्यात आला आहे.                 ठाणे महापालिकेच्या इंग्रजी शाळांमधून गेली १४ वर्ष बेकायदेशीरपणे फी ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने वसुली केली असल्याची माहिती, माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे. समान शिक्षण मूलभूत अधिकार समितीने हि माहिती उघड केली असून या बेकायदा फी वसुलीच्या विरोधात थेट राज्याच्या मुख्य सचिवांकडे पत्र पाठवून दाद मागितली आहे. विशेष म्हणजे नगरविकास विभाग आणि उपशिक्षण संचालक, मुंबई विभाग यांनी वसूल केलेली फी परत द्यावी असे आदेश देऊनही ठाणे महापालिकेने ही फी परत या विद्यार्थ्यांना दिलेली नव्हती. याशिवाय १० पट दंड तसेच प्रतिवर्षी प्रति विद्यार्थ्यांमागे ६ हजार रु पये शैक्षणिक साहित्यासाठी झालेला खर्च देखील ठाणे महापालिकेला द्यावा लागणार आहे. अशा चुकीचा कारभार करणाऱ्या  दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी देखील समितीने केली आहे.          ठाणे महापालिकेने २००३ साली महापालिकेच्या इंग्रजी शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. ज्या वर्षांपासून ठाणे महापालिकेने इंग्रजी शाळा सुरु केल्या त्याच वर्षी या शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या  विद्यार्थ्यांकडून ठाणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाने फी वसूल करण्यास सुरु वात केली. २००३ साली या फी पोटी शिक्षण मंडळाला ६ लाखांचे उत्पन्न मिळाले. मात्र २००२ च्या राज्य घटनेच्या मूलभूत अधिकारांमध्ये शिक्षण हक्क कलम २१ नुसार शिक्षणाचा मोफत हक्क देण्यात आला आहे. त्यामुळे अशा प्रकारचा फी वसुलीचा अधिकारच ठाणे महापालिकेला नसून ठाणे महापालिकेने २००३ साली केलेला ठरावच बेकायदा असल्याचे समितीचे म्हणणे आहे. या समितीच्या माध्यमातून एका विद्यार्थ्याच्या शाळा प्रवेशाच्यावेळी शिक्षण मंडळांकडून बेकायदेशीर फी घेण्याचा प्रकार उघड झाला. त्यानंतर पालिका आयुक्तांनी १ जून २०१७ रोजी शिक्षण मंडळाला आदेश काढून ही बेकायदा फी वसुली बंद करण्याचे आदेश दिले. त्यानंतर ४ जुलै २०१७ रोजी नगर विकास विभागाने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. याशिवाय २३ नोव्हेंबर २०१७ रोजी उपशिक्षण संचालक, मुंबई विभाग यांनी देखील फी परत देण्याचे आदेश दिले.              दरम्यान आता ठाणे महापालिकेने देखील विद्यार्थ्यांकडून वसूल करण्यात आलेली फी परत देण्याचा निर्णय घेतला असून तशा प्रकारचा प्रस्ताव शिक्षण विभागाने तयार केला आहे . इंग्रजी शाळा सुरु केल्यानंतर या विद्यार्थ्यांकडून नाममात्र फी घेण्यात आली होती. इंग्रजी शाळा या विनाअनुदानित असल्याने ही नाममात्र फी घेण्याचा निर्णय त्यावेळी घेण्यात आला होता. मात्र शिक्षण हक्क कलम २१ नुसार मोफत शिक्षण देणे बंधनकारक असताना फी वसूल करता येत नसल्याचे उपसंचालक, शिक्षण विभाग यांच्यावतीने करण्यात आल्यानंतर अखेर हि फी परत देण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. केवळ सव्वा कोटींची फी परत देण्यात येणार असल्याने घनश्याम सोनार यांनी मात्र ही रक्कम जास्त असल्याचा दावा केला आहे. नेमकी किती वर्षांपासूनची फी प्रशासनाच्या वतीने परत करण्यात येत आहे याचे स्पष्टीकरण प्रशासनाने केले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. विनाअनुदानित शाळा सुरु करण्याचा अधिकारच महापालिकेला नसताना शाळा सुरूच कशा केल्या असा प्रश्न सोनार यांनी उपस्थित केला आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाSchoolशाळा