शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे पालिकेची तीन पुलांवर १३ कोटी रुपयांची उधळपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 00:00 IST

कामे थांबवण्याची भाजपची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : घोडबंदर भागात मेट्रोची कामे सुरू असून तेथील पादचारी पूल काढण्याचे प्रयोजन आहे. परंतु, असे असतानाही या भागात दोन आणि कॅडबरी सिंघानिया शाळेजवळ एक असे तीन पादचारी पूल उभारण्यात येत आहेत. मुळात आधीच्याच पादचारी पुलांचा वापर होत नसताना पुन्हा १३ कोटींचा खर्च करण्याच्या निर्णय सत्ताधारी शिवसेनेच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. 

ठामपाने यापूर्वी देखील घोडबंदरला विद्यापीठ, आर मॉल तसेच विवियाना मॉल, आनंदनगर टोलनाका आदींसह इतर ठिकाणीही पादचारी पूल उभारले आहेत. परंतु त्यांचा वापर अगदी नगण्य  आहे. केवळ तेथील मॉलसाठीच ते उभारल्याचे यापूर्वीही स्पष्ट झाले आहे. त्यात आता सिंघानिया शाळेजवळही ३.७४ कोटींचा खर्च करून पादचारी पूल उभारण्यात येत आहे. याचे भूमिपूजन नुकतेच महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते झाले आहे. तर घोडबंदरच्या कारमेल आणि पंचामृत या भागातही नऊ कोटी खर्चून दोन पादचारी पूल उभारण्याचा घाट घातला जात आहे. आधीच्याच पुलांवर केलेला खर्च हा वाया गेलेला आहे. त्याचा वापर होत नाही. त्यातही घोडबंदर भागातील सध्याचे पूल हलविण्याचे प्रयोजन असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे पूल काढून दुसरीकडे पुन्हा बसविता येतात, असा दावा यापूर्वी प्रशासनाने केला आहे. त्यामुळे तेच काढून नव्याने प्रयोजन करण्यात येत असलेल्या पादचारी पुलांच्या ठिकाणी बसवावेत, जेणे करून पालिकेच्या खर्चातही बचत होईल, अशी मागणी भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी केली आहे. कोरोनामुळे पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यामुळे ही उधळपट्टी बंद करावी अन्यथा भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला. 

प्रशासनाला हाताशी धरून सत्ताधारी शिवसेना आगामी महापालिका निवडणुकीवर डोळा ठेवून या माध्यमातून फंड गोळा करीत  आहे.  - मनोहर डुंबरे, गटनेते, भाजप, ठामपा

टॅग्स :thaneठाणेBJPभाजपा