शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगाच्या उदरनिर्वाहासाठी ठाणे महापालिकेने उचलले पाऊल, २५.५० कोटींची केली तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 15:38 IST

दिव्यांगाना विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी ठाणे महापालिकेने पावले उचलली आहेत. त्यानुसार यासाठी २५.५० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे.

ठळक मुद्देकुष्ठ रुग्णांनाही मिळणार मदतउदरनिर्वाहासाठी अर्थसहाय्य

ठाणे - ठाणे महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत यंदा दिव्यांग व्यक्तींसाठी कल्याणकारी योजना १०० टक्के राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी मदत, ६० वर्षावरील दिव्यांगाना उदरनिर्वाहासाठी अर्थसहाय्य, व्हिलचेअर उपलब्ध करुन देणे, कुष्ठ रुग्णांना उदरनिर्वाहासाठी अनुदान आदींसह इतर योजनांचा समावेश करण्यात येऊन यासाठी २५ कोटी ५० लाखांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.                       या संदर्भातील प्रस्ताव येत्या १९ सप्टेंबरच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. दिव्यांगासाठी दरवर्षी विविध योजनांची घोषणा केली जाते. परंतु मागील चार ते पाच वर्षात या योजनांसाठी तरतूद करण्यात आली होती. परंतु त्याचे नियोजनच होत नसल्याने त्याचा लाभ दिव्यागांना मिळत नव्हता. परंतु मागील वर्षी पासून पालिकेने नियोजनावर भर देण्यास सुरवात केली असून दिव्यांगाच्या निधीतही वाढ केली आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाकरीता शिष्यवृत्ती, अर्थसहाय्य लाभार्थ्यांची संख्या ५००, उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य लाभार्थी संख्या १५०, खेळाडूकरीता शिष्यवृत्ती अर्थसहाय्य लाभार्थी संख्या १०, दिव्यांग व्यक्तींना उदरनिर्वाहसाठी निधी थेट बँक खात्यात लाभार्थी संख्या २१००, व्यवसायासाठी निधी किंवा साहित्य खरेदी लाभार्थी संख्या १५०, वैद्यकीय खर्चासाठी अर्थसहाय्य लाभार्थी ५०, बचत गटांना सहाय्य लाभार्थी ३०, ६० वर्षावरील दिव्यांगाना उदरनिर्वाहासाठी अर्थसहाय्य लाभार्थी ३००, बेराजगार भत्ता लाभार्थी ५००, लग्नासाठी अर्थसहाय्य लाभार्थी १००, कुष्ठ रुग्णांना उदरनिर्वाहासाठी अनुदान लाभार्थी ५५० आदींसह इतर योजनांचाही समावेश करण्यात आला असून त्यासाठीसुध्दा आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. यासाठी २५ कोटी ५० लाखांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली असून या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त