शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी ठाणे महापालिकेची यंत्रणा सज्ज; नवीन लाटेची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 23:49 IST

नवीन लाटेची भीती : कुलूप बंद केलेले कोविड सेंटर पुन्हा चालू करण्याची लगबग

अजित मांडकेठाणे  : ठाणे  महापालिका हद्दीत कोरोना पुन्हा एकदा वाढू लागला आहे. त्यामुळे महापालिकेने सतर्कतेच्या दृष्टिकोनातून काही कुलूपबंद केलेले कोविड सेंटर पुन्हा चालू करण्याची लगबग सुरू केली आहे. या ठिकाणी साफसफाई करून ते पुन्हा कोरोना रुग्णांसाठी सज्ज करण्यात येत आहे. तर आणखी एक नवे कोविड सेंटर येत्या आठवड्यात सुरू करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांत शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या प्रत्यक्ष रुग्णांची संख्याही वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात होती. त्यामुळे महापालिकेने टप्प्याटप्प्याने कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार वागळे, कळवा, मुंब्रा येथील कोविड सेंटर बंद केले. तर भाईंदरपाडा येथील सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी तयार केलेले सेंटरही बंद केले होते. परंतु, नव्या वर्षात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.

नागरिकांकडून नियमांचे होणारे उल्लंघन, मास्क न वापरणे, गर्दी करणे यामुळेदेखील रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पुन्हा दुसरी लाट येण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. यापूर्वी कोविड सेंटरमध्ये चार हजारांहून अधिक बेड शिल्लक होते. परंतु,  ते बंद केल्याने बेडची संख्याही कमी झाली होती.  सध्याच्या घडीला ११ ठिकाणी कोविड सेंटर सुरू आहेत. यातील काही सेंटर बंद होते. तेदेखील आता सुरू करण्यात येत असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. 

एक नवीन सेंटर  होणार सुरूठाणे महापालिकेच्या माध्यमातून सध्याच्या घडीला १० सेंटर सुरू असून भाईंदरपाडा येथील सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी एक इमारत सज्ज केली आहे. त्यानुसार ११ कोविड सेंटर सुरू झाली आहेत. तर ज्युपिटर रुग्णालयासमोर असलेल्या पार्किंगच्या जागेवर कोविड सेंटर उभारले असून येथे एक हजार १७७ बेड आहेत. येत्या काही दिवसांत हे सेंटरही सुरू करण्यात येणार आहे. - संदीप माळवी, उपायुक्त, ठामपा

ठाणे शहरामध्ये ११ कोविड सेंटर सुरू शहरात यापूर्वी पालिकेची आणि खासगी मिळून ३४ कोविड सेंटर सुरू होते. परंतु आता ती संख्या ११ वर आली आहे. त्या ठिकाणी एक हजार ९६९ बेड उपलब्ध असून ८६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये १७८ रुग्ण हे आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत.

कोविड सेंटरमध्ये  ६५३ रुग्णांवर उपचार महापालिकेच्या ग्लोबल इॅम्पॅक्ट हब येथील कोविड सेंटरमध्ये सध्याच्या घडीला १०७४ बेड उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी सध्या ६५३ रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती महापालिकेने दिली. यामध्ये आयसीयूमध्ये १३२ रुग्ण उपचार घेत आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे