शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

धुळीचे प्रदुषण रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने सुरु केली रस्त्यांची धुलाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 16:46 IST

धुळीचे प्रदुषण रोखण्यासाठी अखेर ठाणे महापालिकेने रात्रीच्या सुमारास रस्त्यांची धुलाई सुरु केली आहे. त्यानुसार पहिला मान हा पोखरण नं. १ ला मिळाला असून या रस्त्याची धुलाई गुरुवारी रात्री करण्यात आली.

ठळक मुद्देशहरातील १४० किमी रस्त्यांची पालिका करणार धुलाईसांडपाण्यावर प्रक्रिया केलेले २० एमएलडी पाणी जाणार वापरले

ठाणे - शहरातील धुळीचे प्रदुषण रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने आता तब्बल १४० किमीचे रस्ते धुवण्याची मोहीम हाती घेतली आहे. यासाठी एका खाजगी एजेन्सीची नेमणूक करण्यात आली असून त्यामाध्यमातून आता रस्ते धुलाईची सुरवात झाली आहे. त्यानुसार गुरवारी रात्री पोखरण नं. १ पासून या कामाला सुरवात झाली आहे. दहा दिवसा आड अशा पध्दतीने प्रत्येक रस्ता धुतला जाणार असून यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले २० दशलक्ष लीटर पाणी वापरले जात आहे.                    ठाणे महापालिका हद्दीत मागील वर्षीच्या तुलेत यंदा वाहनांच्या संख्येत १ लाख ०५ हजार ५३४ एवढी वाढ झाली आहे. त्यातही शहरातील दुचांकींची संख्या ही १० लाख ७६ हजार ५६४ एवढी झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही वाढ ७२ हजार ७७३ एवढी झाली आहे. तर शहरात आजच्या घडीला एकूण १९ लाख २७ हजार १५५ वाहने असल्याचे पर्यावरण अहवालात नमुद करण्यात आले आहे. महापालिकेने केलेल्या सर्व्हेक्षणात शहरातील हवेतील धुळीकणांचे प्रमाण हे मानकापेक्षा मर्यादेपक्षा जास्त आढळून आले आहे. तर शहरातील मुख्य १६ चौकांच्या ठिकाणी हवेतील धुळीकणांचे प्रमाण हे मानकापेक्षा जास्त आढळले आहे.            दरम्यान, ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी नुकत्याच घेतलेल्या एका बैठकीत यावर उपाय योजना करण्याचे आदेश दिले असून अशा प्रकारचे रस्ते धुवण्याच्या सुचना केल्या आहेत. त्यानुसार नगर अभियंत्याच्या मार्गदर्शनाखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून गुरुवार पासून शहरातील १४० किमी रस्त्यांची धुलाई सुरु झाली आहे. स्वच्छता अभियानाचा एक भाग म्हणून रात्री १२ ते पहाटे चार वाजेपर्यंत हे रस्ते धुतले जात आहेत. यासाठी कोपरी येथील मलनिसारण प्रक्रिया केंद्रातील २० दशलक्ष लीटर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर केला जाणार आहे. पालिका यासाठी १० टँकर उपलब्ध करणार आहे. प्रत्येक १० दिवसा आड अशा पध्दतीने या रस्त्यांची धुलाई केली जाणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. त्यानुसार पहिल्या टप्यात पोखरण नं. १ या रस्त्याची धुलाई गुरुवारी रात्री करण्यात आली आहे. तर टप्याटप्याने शहरातील इतर रस्त्यांची धुलाई देखील याच पध्दतीने केली जाणार असून धुळीचे प्रमाण कमी करुन प्रदुषणापासून मुक्तता करण्याचा हा एक प्रयत्न असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त